गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे नाल्याच्या वर केलंय अतिक्रमण.
महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी काढतायेत झोपा.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- गोरेगांव पश्चिम मधे प्रेम नगर च्या वसाहतीच्या लगत असणाऱ्या नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. पहिले तिथे एकच झोपडी पद्धतीच घर बांधलं होतं, आणि आता लाईनीत 7,8 घरांची उभारणी केल्याचे चित्र दिसत आहे, व नाल्याच्या मागील बाजूस गॅरेज, आणि पार्किंग यार्ड बनवण्यात आला आहे, आचर्याची गोष्ट म्हणजे त्या भागाला एक गेट बनवण्यात आला आहे, जसं काही ती कोणाची तरी खासगी मालकी आहे, सर्रास कायद्याची तमा न करता वाहन धारकांकडून पार्किंग चे पैसे वसुल केले जातात. सध्याची प्रेम नगरची स्थिती पूर्णतः बिघडली असून त्याला पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जवाबदार आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
तिथे राहणारे काही टपोरी लोकं असं उद्योग करतात हे निष्पन्न होत आहे, पण यांना एवढी मस्ती कोणाच्या आशीर्वादाने येते हा महत्वाचा विषय आहे, परप्रांतीय लोकं इथे येऊन बिनधास्त कोठेही अतिक्रमण करू शकतात. आणि आमची महापालिका झोपा काढत राहणार, एवढा गंभीर विषय आहे कि पालिकेला त्याचं काहीच पडलं नाही, हा संशोधनाचा विषय आहे, असं आता सर्वसामान्य जनतेला वाटू लागलंय. कुठल्याही गोष्टीवर अंकुश राहिला नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सदर विषयाचा पाठपुरावा करून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सदर प्रेम नगर वसाहतीच्या व होंडा वर्क शॉप च्या समोर नाल्यावर झालेल्या अतिक्रमनाचा गंभीर विषय लक्षात घेता त्वरित कारवाई करावी आणि तिथला रस्ता वाहतुकीस खुला करावा, आणि तिथल्या अवैध पार्किंग चे पैसे वसुल करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी तिथल्या स्थानिक नागरिकांची मांगणी आहे.