भिवंडीतील गायत्री नगर येथे वन विभागाच्या डोंगरावरील झोपड्यांवर कारवाई करण्यास, नागरिकांनी केला प्रखर विरोध

भिवंडीतील गायत्री नगर येथे वन विभागाच्या डोंगरावरील झोपड्यांवर कारवाई करण्यास, नागरिकांनी केला प्रखर विरोध

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी : भिवंडी शहरातील नागाव गायत्री नगर येथील वन विभागाच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वसलेली आहे. त्याठिकाणी पालिका प्रशासनाने शनिवारी अचानक कारवाई करण्यास सुरवात केल्या नंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून प्रखर विरोध केला आहे. २४ जून रोजी येथील डोंगरावरील माती खचल्याने सात झोपड्या जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेने या भागातील झोपड्यां वर कारवाई करण्याचा निर्णय घेत शनिवारी या ठिकाणी वन विभागासह पोलिस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यास सुरवात केली होती. सुरवातीला महापालिकेने स्थानिक घरांचे वीज व नळ कनेक्शन खंडित करीत येथील घरांचा विद्युत पुरवठा बंद करीत सुमारे १५० हून अधिक वीज मीटर काढून जप्त केले. तर अनेक नळ तोडून कारवाईस सुरवात केली. त्यानंतर स्थानिक माजी नगरसेवक विकास निकम व शरद धुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . त्यानंतर पालिका
प्रशासनाने कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने येथील परिस्थिती शांत झाली. ऐन पावसाळ्यात पालिका करीत असलेली कारवाई ही अयोग्य असून, जेथे दरड कोसळल्याने झोपड्यांचे नुकसान झाले तेथील झोपड्या हटवण्यास आमचा विरोध नाही पण सरसकट सर्व घरांवर होणारी कारवाई अयोग्य असून पालिका उच्च अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली त्याचा आम्ही निषेध करत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक विकास निकम यांनी दिली आहे.