*ति आजी आहे नंबर वन…आजी नातवाची एक अनोखी कहाणी*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी …आजी आजोबा चा लढा नातवाला असतोच अशातच गोंडपीपरी तालुक्यातील एका नातवाचे जगच आजीची कूस ठरली आहे तब्बल अठरा वर्षांपासूनच तो आजीच्या खांद्यावर वावरतोय त्याचे सर्व अवयव निकामी झाले आहेत त्यांचा हावभावावरून त्याची गरज आजी ओळखते नातवाला मायेची सावली देणारी ति आजी नंबर वन ठरली आहे .त्या आजीचे नाव .. सुनीता दयालवार असे आहे
गोंडपीपरी तालुक्यातील धाबा या गावची ओळख संतनगरी आहे या गावच्या आजीची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे सूनिता दयालवार .. सदाशिव दयालवार.यांची मोठी मुलगी कल्पना हिचा विवाह मूल तालूक्यात येणाऱ्या सिंताळा येथील शरद काणमपेल्लीवार यांच्याशी झाला त्याचे पहिले अपत्य होते यश ..यशचा जन्म झाला तेव्हा सगळे आनंदात होते मात्र या आनंदात काळाने विरजण टाकले जन्माच्या तिसऱ्या दिवशी यश ला कावीळ आजार झाल्याचे निदाध करण्यात आले चंद्रपूरातील एका खासगी रुग्णालयात यश वर उपचार करण्यात आले मात्र उपचाराला यश च्या शरीराने प्रतीसाध दिला नाही ..यशचे वय वाढू लागले मात्र सामान्य बालकाप्रमाने त्याच्या शरीराची तथा मेंदूची वाढ झाली नाही तपासणी अंती यश पुर्णतः अस्थिव्यंग तथा मतीमंद झाल्याचे निदाध करण्यात आले आई कल्पना वडील शरद यांना यशचा मोठा जिव्हाळा होता मात्र यशने आजी सुनिता दयालवार यांचे ह्रदयात जागा निर्माण केली होती काही वर्ष आई वडिलाकडे राहलेल्या यशला आजीने घरी आनले यशने आजीला चांगलाच लडा लावला होता यशच्या हावभावने त्याला काय हवं काय नको हे ओळखायची यश स्वताच्या पायावर उभा होऊ शकत नाही त्याला निट बोलताही येत नाही सामान्य मुलाप्रमाणे तो सौच.लघवी ही करू शकत नाही जन्मापासून आजतागायत आजीची कूस अन् खाट हेच यशचे जग झाले आहे आज यशचे वय अठरावर्ष झाले या अठरावर्षात यशने आजीच्या खांद्यावर च पुर्ण वेळ घालवला यशच्या आई वडिलाने अनेकदा आपल्या सोबत घेऊन जाण्याचा विचार केला मात्र आजी सूनिताबाईने प्रत्येक वेळी नकार दिला अठरा वर्षे झालीत आजही यश आजी आजोबा कडेच आहे आजी म्हणजे यशचे जिव की प्राण आहे यश म्हणजे आजीसाठी जगण्याचा श्वास आहे आजी नातवाचे हे नाते पंचक्रोशीत चर्चेला जात आहे यश च्या आजीकडे बघून आम्हाला ही अशीच आजी लाभो असे गावातील नातवंडे बोलतात