अहेरी शहरातील प्रमुख रस्तावरील खड्डे तातडीने बुजवा.. कार्यकारी अभियंता यांच्याकडे भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांची मागणी..

मारोती कांबळ
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी ग्रामीण
मो.नं ९४०५७२०५९३

कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, अहेरी शहरातील खड्डे लवकरच बुजविण्याचे दिले आश्वासन..

अहेरी शहरात सद्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शहरातील जनतेला तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास होत आहे, ह्या खड्डामुळे मोठे अपघात होण्याची ही शक्यता आहे, ह्याबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आल्यावर ह्याची त्वरित दखल घेत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता (E.E.) अतुल मेश्राम साहेब यांची काल भेट घेतली, त्यांना ह्यावेळी एक निवेदन देऊन अहेरी शहरातील प्रमुख रस्तावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी त्यांच्याकडे केली..
अहेरी शहरातील आलापल्ली मार्ग, महागाव मार्ग, देवलमरी मार्ग, खमनचेरु मार्ग तसेच वांगेपल्ली गुडेम पोचमार्ग अश्या प्रमुख मार्गावर सद्या मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने, सद्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या विभागाकडून हे खड्डे बुजविण्याची मागणी ह्यावेळी अमोल गुडेल्लीवार यांनी ह्या निवेदनातुन केली, ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम साहेब यांनी संबंधित विभागाला ह्या बाबत त्वरित सूचना दिल्या तसेच येत्या 2 ते 3 दिवसात शक्य तितके खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्याचे आश्वासन ह्यावेळी त्यांनी दिले, त्यामुळे अहेरी शहरातील खड्यांची समस्या लवकरच सुटण्याची शक्यता आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here