अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करा* *आमदार प्रतिभाताई धानाोरकर यांची आदिवासी विकासमंत्र्यांकडे मागणी*
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करा* *आमदार प्रतिभाताई धानाोरकर यांची आदिवासी विकासमंत्र्यांकडे मागणी*

*अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करा*

*आमदार प्रतिभाताई धानाोरकर यांची आदिवासी विकासमंत्र्यांकडे मागणी*

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करा* *आमदार प्रतिभाताई धानाोरकर यांची आदिवासी विकासमंत्र्यांकडे मागणी*
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करा*
*आमदार प्रतिभाताई धानाोरकर यांची आदिवासी विकासमंत्र्यांकडे मागणी*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर ः -जिल्ह्यात आदिवासी समाजबांधवांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयामुळे चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी निर्मिती कार्यालय मंजूर केले. मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हे कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आदिवासी विकासमंत्री अॅड. के. सी. पाडवीजी यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रात चंद्रपूर, गोंदिया, धुळे, पालघर, नाशिक, किनवट आणि यवतमाळ या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी समाज हा बहुसंख्येने आहे. जिवती, कोरपना, चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड आणि सिंदेवाही या तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांना जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गडचिरोली येथील समितीच्या कार्यालयात वारंवार जावे लागयाचे.गडचिरोलीचे अंतर तालुक्यापासून बरेच आहे. महाराष्ट्र शासनाने १३ सप्टेंबर २०१९ च्या शासननिर्णयामुळे नव्याने चंद्रपूर येथे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तपासणी निर्मिती केल्याने आदिवासीबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आर्थिक मुकसान व शारीरिक श्रमही कमी होणार होते. त्यामुळे तातडीने समितीचे तपासणी कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here