*ऐतिहासिक बुध्दभूमी गडचांदूर येथे बोधीवृक्षारोपन उत्साहात संपन्न.*

✒डॉ भोलेनाथ मेश्राम✒
जिवती तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यु-82750 74426
गडचांदूर:- प्रथम धम्मचक्र प्रवर्तन व वर्षावासाच्या आषाढी पोर्णिमेच्या निमित्ताने दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बाबासाहेब निर्मित धम्म संघटनेच्या प्रचारांचा भाग रिपब्लिकन जागृती अभियान तर्फे ऐतिहासिक बुध्दभूमी, गडचांदूर त. कोरपना जि. चंद्रपूर येथे बोधीवृक्ष रोपन करण्यात आले.
कार्यक्रमांच्या सुरुवातीला आदरनीय भंते कश्यप यांनी उपस्थितांना आषाढी पोर्णिमेचे महत्त्व विशद करून तद्नंतर त्रिसरणं- पंचशील दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित मातृसंघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी कोविड 19 च्या जीवघेण्या संसर्गजन्य महामारीत लाखो लाख मोलाचे जीव प्राणवायुच्या ( ऑक्सीजन ) अभावामुळे जीवास मुकले. वृक्ष- वल्ली पासून आपणाला नैसर्गिक व मुबलक प्रमाणात प्राणवायु मिळत असतो म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. बोधीवृक्षाचे आयुर्वेदीक औषध उपचाराचे महत्त्व आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कसें आणि किती महत्त्वपूर्ण माहिती विशद करण्यात आली.
जिथे जिथे बुध्द विहार, परिसर, वार्ड, गांव, खेडी, नगरात आपण बोधीवृक्षाचे रोपन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंघटनेचे धेय्य व उद्दीष्टे उपस्थितांना सांगतानाच या संघटनेचे रोपन अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण बाबासाहेबांच्या संघटनेचे महत्त्व आंबेडकरी समाजात सांगण्यास कमी पडत असल्यामूळे निरर्थक बाजारबुणगे व त्यांच्या तकलादू संघटना आपल्या समाजात जोर करीत आहेत. आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते, अनुयायी समजत असाल तर बाबासाहेबांच्याच संघटना उभ्या करण्यासाठी आपण ताकद पणाला लावण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.
सदर प्रसंगी भंते कश्यप, बुध्दभूमी यांच्या उपस्थितीत अशोककुमार उमरे यांनी, बळीराम गेडाम, ईश्वर पडवेकर ( शिक्षक) बुध्दभूमी परिसरात बोधीवृक्षाचे आणि वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमांस प्रभाकर खाडे, शिवाजी धुपे, सि. डी. उमरे, भसारकर, पाटील, डोंगरे इत्यादी उपस्थित होते.