नागपुर महिला न्यायाधीशाच्या घरात चोरी; लाखोचे साहित्य लपास.

नागपुर महिला न्यायाधीशाच्या घरात चोरी; लाखोचे साहित्य लपास.

नागपुर महिला न्यायाधीशाच्या घरात चोरी; लाखोचे साहित्य लपास.
नागपुर महिला न्यायाधीशाच्या घरात चोरी; लाखोचे साहित्य लपास.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.30 जुलै:- नागपुर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपुर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या घराचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यापासून प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरच्या सीव्हील लाईन भागातील रवीनगर येथील शासकीय वसाहतीत असलेल्या A-9-1 क्रमांकाच्या घरात नागपुरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गरिमा नारायण बागडोदिया वय 40 वर्ष ह्या राहतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या न्यायालयात आपल्या कर्तव्यावर गेल्या होत्या. याचाच फायदा घेऊन त्यांच्या घराचा मागच्या दाराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले आणि त्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून अंगठी तसेच सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण 1 लाख, 77 हजारांचा ऐवज चोरून नेला.

बुधवारी सायंकाळी 4.45 वाजताचा सुमारास फिर्यादी न्यायालयातून आपले काम आटपून घरी परतल्या तेव्हा ही घटना उघडकीस आली. माहिती कळताच अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्याचा शोध लावण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेतले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखवला.

दरम्यान, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या शासकीय घरात चोरी झाल्याचे कळताच एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती घेऊन तपासासंदर्भात मार्गदर्शन केले.