मुंबईच्या पालघर मध्ये बस चालक आणि महिला वाहका कडुन वयोवृद्ध दांपत्यास अमानुषरित्या मारहाण.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई/पालघर,दि.30 जुलै:- आज मुंबईच्या पालघर मधून संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी बस सावकाश चालवा असे सांगितल्याचा राग मनात धरून एका वयोवृद्ध दांपत्यास बस चालक व महिला वाहकाने अमानुष मारहाण केल्याची घटना वाडा बसस्थानकात घडली. दरम्यान, या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून बस चालक व महिला वाहकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. बसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार अशी वयोवृद्ध दांपत्यास मारहाण केलेल्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती. मनोर सोडून पुढे हमरापूर फाट्यावर आल्यावर येथे जर्नादन सदू पाटील वय 65 व त्यांची पत्नी सुमन पाटील हे वयोवृद्ध दांपत्य बसमध्ये बसले.चालक बस जोरात चालवत असल्याने बसचालकाला बस सावकाश चालवा असे वयोवृद्ध इसमाने त्यांना सांगितले. त्यावरून बसमध्ये चालक वाहक व जर्नादन यांची बोलाचाली झाली. त्यानंतर वाडा बसस्थानकात बस आल्यानंतर तिथे हे दांपत्य बसमधून उतरले. त्यानंतर वाहक व चालकांनी त्यांना अमानुष पणे मारहाण केली. स्थानकातील इतर प्रवासी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. एसटी बसचा चालक आणि महिला वाहक वयोवृद्ध दाम्पत्याला मारहान करत होत्या त्यावेळेस कुणीतरी त्याचा वीडियो बनवुन समाज मध्यमावर प्रसारीत केला. दरम्यान घटनेची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल होताच व वयाचा विचार न करता मारहाण केल्याने या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here