*मुल शहरात राज्यातील पहिले पतंजली योगभवनाचे उद्घाटन होत असल्याने नागरिकांनी माणले आ सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच मणापासून आभार*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
: हजारों वर्षापासून आपल्या भारत देशात योगसाधना सुरू आहे. आज सर्वसामान्य माणूस सुध्दा योगसाधना करतो ही अतिशय आनंदाची बाब आहे. जगातील १७५ देशांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात मंजूरी दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. निरामय आरोग्याच्या दृष्टीने योगसाधना अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्रातील पहिले पंतजली योगभवन मुल शहरात उदघाटीत करताना मला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
२८ जुलै रोजी मुल शहरात योग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मुलच्या नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, ज्येष्ठ नागरिक विजयराव चंदावार, भगवान पालकर, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, अनिल साखरकर, वंदना लाकडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्टनकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मुल नगर परिषदेने ठराव पारीत करून योगभवन पतंजली योग समीतीला हस्तांतरीत करावे. संस्थेला लागणारे सर्व साहित्य आपण पुरविणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. योगगुरू स्वामी रामदेव महाराज यांना आपण दिलेल्या निमंत्रणानुसार ते मुल येथे आले त्यामुळे मुल शहरात योगभवन उभारणे औचित्यपूर्ण असल्या