संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्त
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्तसंभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्त

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्त

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्त
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेची क्षमता वाढव: विभागीय आयुक्त

ठळक मुद्दे

कोविड सुविधेचा आढावा

जि एम सी व ऑक्सिजन प्लांटला भेट

कोविड केंद्राची पाहणी

रुग्णालयाचे फायर ऑडिट करा
=======================
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

गोंदिया :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गोंदिया जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागासह विविध यंत्रणांनी उत्कृष्ट काम केल्याचा उल्लेख करून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. विशेषतः प्राणवायू निर्मिती मध्ये गोंदिया जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासोबतच वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी प्रशासनाला दिल्या.

विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राणवायू निर्मिती प्लांट, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाभरात कोविड केअर सेंटरमध्ये 922 खाटा उपलब्ध असून त्यापैकी 325 खाटा ऑक्सिजनच्या आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. लसीकरणामध्ये जिल्ह्याचे काम चांगले असून जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे 3 लाख 88 हजार 20 व कोव्हॅक्सीन लसीचे 2 लाख 23 हजार 210 असे एकूण 6 लाख 11 हजार 230 डोस प्राप्त झाले असून आतापर्यंत 5 लाख 75 हजार 858 व्यक्तींनी लस घेतली आहे. या पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 57 हजार 579 तर दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 18 हजार 288 एवढी आहे.
जिल्ह्यात सध्या दहा क्रियाशील रुग्ण असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.19 टक्के तर रिकव्हरी रेट 98.23 टक्के आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून पेडियाट्रिक वार्ड सुद्धा सज्ज करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून प्राणवायू प्रकल्प निर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना श्रीमती लवंगारे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. रुग्णालयाच्या सर्व यंत्रणा सतर्क आहेत की नाही यासाठी मॉकड्रिल घेण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन प्लांटला भेट दिली व समाधान व्यक्त केले.

आशा वर्कर यांचा योग्य सन्मान करा
कोविड काळात आशा वर्कर यांनी उत्कृष्ट काम केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी निदर्शनास आणून दिले असता कोरोना काळात आशा वर्कर यांनी सर्वच ठिकाणी चांगले काम केल्याचे नमूद करून आशा वर्कर खऱ्या कोरोना योद्धा आहेत असे श्रीमती लवंगारे म्हणाल्या. सर्व आशा वर्कर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करा. कोविड असल्यामुळे हा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here