शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची सिरोंचा नगर पंचायतीला भेट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची सिरोंचा नगर पंचायतीला भेट

*शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची सिरोंचा नगर पंचायतीला भेट

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची सिरोंचा नगर पंचायतीला भेट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची सिरोंचा नगर पंचायतीला भेट

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण
मीडिया वार्ता न्युज
मो.नं ९४०५७२०५९३

विकास कामाविषयी मुख्याधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा
*भरीव निधीसाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन*

सिरोंचा:*- शिवसेनेचे अहेरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी गुरुवार 29 जुलै रोजी येथील नगर पंचायतीत भेट देऊन मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याशी सविस्तर व सकारात्मक चर्चा केले.
गत तीन दिवसाआधी रियाज शेख यांनी, शिवसंपर्क अभियान सिरोंचा नगरात राबविले होते. त्या दरम्यान शहरातील अडी-अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण सोयी-सुविधा व उपक्रमे राबविण्यासाठी मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केले.
अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असून अंतर्गत रस्ते, नालीचे साफ सफाई, स्वच्छता, कोरोना मुक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आदी विषयांकडे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्यासाठी व रेंगाळत असलेले विकास कामे पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याशी दीर्घ चर्चा केले.
सिरोंचा शहराच्या विकासकामांसाठी आराखडा तयार करून राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे आग्रह करून विकास कामांसाठी भरीव निधीची उपलब्धता करू असे आश्वासनही यावेळी चर्चेदरम्यान रियाज शेख यांनी दिले.
भेट देतेवेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी, संघटक दुर्गेश तोकला, युवा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश गट्टू, उज्जव तिवारी, मधुकर इंगली आदी शिवसैनिक उपस्थित होते.

* बॉक्स *
*नूतन इमारतीसाठी पुढे सरसविणार!*
सिरोंचा हे ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन महत्त्वपूर्ण शहर असून शहराला लागून तेलंगणा व मध्यप्रदेश असून सिरोंचा येथे नगर पंचायतीची बिल्डिंग नसल्याने मोठी गैरसोयी होत आहे. सध्य स्थितीत कारभार महसूल मंडळ कार्यालयातून चालविल्या जात आहे, त्यामुळे या गंभीर विषयाची दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी सुसज्ज अशा नवीन इमारतीसाठी पुढे सरसविणार असून शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. या गंभीर विषयाला घेऊन ते लवकरच पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, राज्याचे नगर विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुंबईत भेटीसाठी धाव घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here