३० जुलै जागतिक मैत्री दिन आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस

३० जुलै जागतिक मैत्री दिन
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस

३० जुलै जागतिक मैत्री दिन आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन, जगभरातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रा प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करणे महत्वाचे मानले जाते.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा इतिहास आणि महत्त्व

2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी लोकांच्या मनात असलेली मैत्रीची भावना आणि त्याचे महत्त्व आणखी मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करून महत्वाचे पाऊल उचलले. गरिबी, दारिद्र्य, प्रदूषण, बेरोजगारी, भूक आणि रोगराई यांनी ग्रासलेल्या समस्याग्रस्त परिस्थितीमध्ये लोकांनी भेदभाव विसरून मैत्री दिन साजरे करावे अशी संस्थेची इच्छा होती. ग्रस्त असलेल्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असले तरी, एकजूटीची भावना निर्माण व्हावी म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो..
मैत्री म्हणजे काय? सोडा हो. व्याख्या काय करायच्यात?
खरंतर व्याख्येत बसतं, ते नातं नसतंच कधी. रोजरोज भेटतात, रोज एकमेकांशी बोलतात तेच खरे मित्र मैत्रीण असतात, असं असत का?
किंवा ते खरंच एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण असतात का? नाही !
मैत्रीला जात नसते, वेळ नसते, वय नसतं, अट नसते आणि रूपही नसतं. प्रेमाच्या कित्येक पुढे गेलेलं नातं म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे असं नातं जे मांडणं शब्दांच्या कुवतीचं काम नसतं.
समोरच्याचा त्याच्या गुणदोषा सकट स्वीकार म्हणजे मैत्री. जगाने आपल्या मित्राला खूप मान द्यावा अशी अपेक्षा नसते, पण त्याचा केलेला अपमान आपल्याला सहन होत नाही, तिथे असते मैत्री.
जिथे मनातलं बोलताना समोरच्याला आपण गमावू अशी भीती नसते, तिथे असते मैत्री. हाताची हातावरली टाळी म्हणजे मैत्री, प्रेमाने केलेली शिवीगाळ म्हणजे मैत्री. राड्या नंतर गच्चीवरची मिटिंग म्हणजे मैत्री.
टपरीवरची वाटून घेतलेली कटिंग म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे जगासाठी अदृश्य पण दोघांच्याही मनात ठळक असलेलं खोल नातं. जिथे देणंही हक्काचं असतं अन घेणंही हक्काचं असतं. ते नातं म्हणजे मैत्री. समोरच्याच्या मनाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेणे याची जाणीव असणे म्हणजे मैत्री.

ही मैत्री कुठे सापडते हो? आयुष्याच्या टप्प्यावर अशी मैत्री कुठेही सापडू शकते. कधी आई वडिलांत, कधी मुलांत, कधी बायकोत, कधी नवऱ्यात तर कधी अनोळखी माणसात. तुमचंही आयुष्य अश्याच मित्र-मैत्रिणींनी भरलेलं असू दे.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा एक उपक्रम आहे जो UNESCO ने भेदभाव दूर व्हावा या भावनेने सुरु केला आहे. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात. मैत्रीच्या नात्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हा दिवस स्मरणीय तसेच विशेष बनवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तुम्हीही तुमच्या घनिष्ट सख्या सोबत मैत्री दिन साजरा करा. तुम्हालाही आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा,💐💐