महाड सुकटगल्ली येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरु ?

61

महाड बाजारपेठ, सुकटगल्ली येथे मटका जुगाराची आतिषबाजी, महाड सुकटगल्ली येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू..

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

महाड :-महाड सुकटगल्ली येथे बेकायदा मटका जुगार तसेच चिमणी पाखरे जोमाने सुरु असून पोलिसांना लाखो रुपयाचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंध्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. महाड सुकटगल्ली येथे मटकां, जुगार, काळा पिल्ला, तीनपत्ती क्लब, चिमणी पाखर असे अनेक प्रकारचे धंदे बेकायदेशीर सुरु असून या अवैध धंद्याकडून हफ्त्याचा प्रसाद घेण्यासाठी दर महिन्याला येथे पोलिसांची ये जा सुरु असते. या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासंल्याण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्याच्यात अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गांवर दिसून आले आहेत. तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठया प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धद्याच्या आहारी जाणाऱ्याची संख्या दिवसान दिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारमुळे महिला वर्गात देखील नाराजी उमटू लागली आहे.

महाराष्ट्रचे ग्रहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्थेची दखल घेऊन महाड सुकटगल्ली येथील मटका, जुगार, काळा पिला,जुगारा विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने “पोलीस” हा महत्वाचा घटक समजला जातो. जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडते, तेव्हा-तेव्हा ती रक्षणासाठी पोलीसांकडेच धाव घेत असते. म्हणूनच पोलीसांना “जनतेचे रक्षक” असे म्हटले जाते. परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच अवैध धंद्यांची पाठराखण करून जनतेला त्रासदायक ठरत असतील तर…? हा तर “कुंपणाने शेत खाण्याचा” प्रकार आहे! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे पोलीस आणि मटका किंग यांचे एक सलोख्याचे नाते निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे पोलीस हा मटका माफीयांची दलाली करीत असल्याचे दिसून आलेले आहे. पोलीस दलासाठी ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे बोलले जात आहे. परिणामी महाड सुकटगल्ली व छत्रपती शिवाजी महाराज चौक च्या बाजूला असणारे सर्व मटका जुगार तातडीने बंद करावे आणि या अवैध धंद्याला साथ देणाऱ्या पोलीसावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून करण्यात येत आहे.