वरंधघाट धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू…

54

वरंधघाट धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू…

राकेश देशमुख

महाड प्रतिनिधी

पुण्याहून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर, बलेनो कार नीरा देवघर पाण्यात कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

कारमध्ये तिघा जणांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली असून रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

संकेत जोशी वय 26, रा. बाणेर असं वाचलेल्या युवकांच नाव तर अक्षय रमेश धाडे वय 27 रा रावेत पुणे, स्वप्निल शिंदे वय 28 पुणे, आणि हरप्रित वय 28 पुणे अशी मृतांची नावे असून भोर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.