जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

असुविधांचा रुग्णांसह नातेवाईकांना त्रास

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग येथे असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने येणाऱ्या रुग्णासहित नातेवाईक यांना होणाऱ्या त्रासाला सामोरे लागत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका आपत्कालीन कार्य /वैद्यकीय (आरोग्य) सेवा सेल अध्यक्ष सागर पेरेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांना निवेदन देत निदर्शनास आणून दिले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदन मध्ये , रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्यालय आहे. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. यामध्ये काही रुग्ण हे अपघातात जखमी झालेले रुग्ण असतात.असा रुग्णांना तपासणी केल्यानंतर अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ असा रुग्णांची क्ष किरण तपासणी तसेच संगणित टोमोग्राफी स्कॅन (सीटी स्कॅन) करण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाईक यांना दिला जातो.क्ष किरण तपासणी जिल्हा रुग्णालयात होत आहे.
मात्र काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात असणारी संगणित टोमोग्राफी स्कॅन यंत्रणामध्ये बिघाड झाले असल्याने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघातातील रुग्णांची संगणित टोमोग्राफी स्कॅन तपासणी करायची असेल तर त्यांना पैसे खर्च करून खासगी रुग्णालयात अलिबाग किंवा वडखळ ,पनवेल तसेच इतर ठिकाणी जाऊन सी टी स्कॅन करून घ्यावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण हे बहुतांशी गरीब असतात. त्यांना खासगी प्रयोग शाळेत जाऊन सी टी स्कॅन तपासणी करून घेण्यासाठी पैसे नसल्याने नाइलाज कोणापुढे तरी हात पसरावे लागते.तरी जिल्हा रुग्णालयातील संगणित टोमोग्राफी स्कॅन यंत्रणा ही दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून गोर गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल.
त्याच प्रमाणे रुग्णालयाच्या आवारात मात्र इमारती बाहेर कोविड काळात जुन्या इमारती शेजारी शौचालय बांधले होते ते बंद केल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईक यांना कुठे तरी आडमार्गाला जाऊन आसरा शोधावा लागल आहे. तरी सदर शौचालय हे सुरु करून रुग्ण तसेच नातेवाईक यांची अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका आपत्कालीन कार्य /वैद्यकीय (आरोग्य) सेवा सेल अध्यक्ष सागर पेरेकर यांनी केली आहे.