खैरकावाडी येथे जन्मलेले प्रा.विठठ्ल बरसमवाड म्हणजे समाजाला लाभलेलं एक अनमोल रत्न
जिल्हा प्रतिनिधी/अभिषेक बकेवाड
नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील खैरकावाडी येथे जन्मलेले प्रा.विठठ्ल बरसमवाड म्हणजे समाजाला लाभलेलं एक अनमोल रत्न होय. आपली अध्यापन सेवा अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यात येळी या गावात महात्मा गांधी विद्यालयात सेवेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सदैव तत्पर आहेत.
आपण समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव असलेले प्रा. विठ्ठल बरसमवाड समाजाच्या वास्तव प्रश्नावर नेहमी लिखाण करुन समाजाला, आजच्या तरुणांना सदैव भानावर आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लेखणीतून अनेक देशभक्तांच्या त्यागासोबतच देशासाठी, समाजासाठी सदैव वाहून घेतलेल्या समाजसेवकां चाही इतिहास समाज माध्यमांद्वारे उजळून काढतात.अनेक प्रासंगिक लेखनातून सरांनी समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा परंपरा व चुकीच्या समजुती यावर लेखणी तून प्रहार करीत आहेत.
नागपंचमीच्या दिवशी सलून का बंद ठेवले जातात?
आजचा तरुण हाच समाजाचा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगिण विकासासाठीच सरांचे लिखाण कार्य सदैव चालू आहे. साधुसंत, समाजसेवक, देशभक्त,समाजसुधारक, शास्त्रज्ञ यांच्या जयंती व स्मृती दिना निमित्त कार्यक्रम घेऊन त्यांच्या कार्याचा उजाळा समाजासमोर करतात.आजपर्यंत व्यक्तिविशेष, मार्मिक, उद्बोधन सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक अशा अनेक विषयांवर सरांचे वृत्तपत्रातून 401 लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच 9 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आजपर्यंत सरांनी’ जीवन कसे जगावे’, तरुणातील व्यसनाधिनता, पर्यावरणाचे जतन व संवर्धन, मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक, बालविवाह ही एक जटील समस्या, मोबाईलचे फायदे तोटे अशा अनेक ज्वलंत विषयांवर व्याख्याने दिली आहेत.
सरांनी आपली अध्यापकीय सेवा देत देत अनेक माध्यमांतून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. या कार्याची दखल घेऊन अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले आहेत. अहिल्यानगर येथील आकाशवाणी केंद्रांनी त्यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. दारिद्र्य नावाची कथा ही त्यांनी प्रसार माध्यमावर सांगितली आहे त्यामुळे अनेक जणांचे ते प्रेरणास्थान आहेत. विठू माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे ते सध्या करत आहेत. विठू माऊली हे प्रतिष्ठान तरुणांचे ऊर्जास्रोत म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध झाले आहे. गुणवंत विद्यार्थी,कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक,वक्ते, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, खेळाडू यांना बोलावून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. समाजाच्या तळागाळा तील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष फक्त शिक्षणावर ठेवावे. अंधश्रद्धा बाळगू नये. विज्ञानाची कास धरावी. नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. देशाविषयी निष्ठा बाळगावी. मोबाईलचा कामापुरता वापर करावा. असे प्रेरणादायी विचार सांगून विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन करतात. सरांच्या कार्याला मानाचा मुजरा.
शब्दांकन:- माधव नारायण वटपलवाड सहशिक्षक जि.प.प्रा.शा.हिप्परगा जा.ता.नायगाव जि.नांदेड