एक तासाच्या पावसाने साचले शहरात पाणी

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट,: -नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
हिंगणघाट दोन ते तीन आठवड्यांच्या खंडानंतर रविवारी हिंगणघाट शहरात सात सुमारास एक तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणीच पाणी साचल्याचे पहायला मिळाले. विशेष करून शहरातील मुख्य समजल्या जाणार्या बस टॉप व कराजा चोक येथे नव्याचे मार्गावर बरेच पाणी साचल्याचे दिसले.
गत अनेक दिवसांपासून जिल्ह्यातच पावसाने खंड दिला होता. त्यामुळे पिकांच्या नुकसानीसह वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला. नागरिकांनी अद्यापही घरातील कुलर खाली उतरविले नाही. प्रचंड गर्मीमुळे ऑगस्ट महिन्यातही हे कुलर सुरूच आहेत. ग्रामीण भागात पावसाअभावी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पिकांवर निरनिराळे रोग आले आहेत. संत्रा फळांच्या गळतीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कृषि तज्ज्ञांचे पाहणी दौरे सुरूच आहेत. दुसरीकडे कुलरच्या टबांमध्ये साठविलेले पाणी असल्याने डेंग्यूच्या साथीचा प्रसार पहाता नगरपालिका प्रशासनाकडूनही शहरात पथकांचे पाहणी दौरे सुरू असून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. मात्र, अनेक दिवसांच्या खंडानंतर रविवारी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.
हिंगणघाट शहरात सात ते नव या दरम्यान जोरदार पाऊस पडला. या अरएक तासाच्या पावासानेच सर्वत्र पाणी साचल्याचे दिसून आले. हिंगणघाट शहरात मुख्य चौक म्हणून गणल्या जाणार्या आबेदकर चौकात पाणीच पाणी साचले होते. या ठिकाणी स्थानिक लहान मुलांनी पाण्याच्या डबक्यात खेळण्याचा आनंद लुटला. तसेच रस्त्यावरील ऑटो गल्लीमध्ये तर इतके पाणी साचले होते
ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी अर्ध्यापर्यंत पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळेही नाली बुजविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाणी बराच वेळ साचले होते. एकंदरीत एक तासात पाऊस बर्याच प्रमाणात आल्याचे यामुळे दिसून आले. पावसामुळे नागरिकांना तूर्तास तरी उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांना पावसाची आणखी प्रतीक्षा आहे.