रा. जि.प.शाळा विकास कॉलनी येथे रक्षाबंधन चे औचित्य साधून एक राखी देशासाठी एक अनोखा उपक्रम…

✍️सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज मंगळवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून एक राखी देशासाठी या उपक्रमांतर्गत रा. जि. प शाळा विकास कॉलनी येथे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी पोलीस खात्यातील श्री. शिवराज बांडे व श्री. बाळू बोरकर यांनी उपस्थिती दर्शवली.पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधली. यामध्ये एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली. 

आपल्या शहरातील सर्व माता भगिनीचे रक्षण आजपर्यंत करीत आहात तसेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. शेळके यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने पोलिस कर्मचारी भारावले होते. सदर कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका सौ. खेमनर मॅडम व श्रीम. गायकवाड मॅडम व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here