सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 29 ऑगस्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिरिंग सिव्हिल विभागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता गेस्ट लेक्चर्स घेण्यात आले.
प्रमुख वक्ता देवेंद्र लोणकर डेफ्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, यांनी आपल्या अनुभवातुन विद्यार्थ्यांना ‘ सिव्हिल इंजिनीयरिंग अँड जॉब ॲपोरचूनिटी‘ या विषयावर विद्यार्थ्याना महत्वाची माहिती दिली, त्यांच्या कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, अभ्यास होकंपट्टी न करता कन्सेप्ट समजून आपल्या विषयात कश्या प्रकारे पारंगत होता येईल तसेच प्रात्यक्षिक अभ्यासावर कश्या प्रकारे लक्ष केंद्रित करावे या विषयावर माहिती देण्यात आली. लेक्चर्स व्यतिरिक्त निरनिराळ्या क्षेत्राची माहिती सांगणाऱ्या खास लेक्चर्सचं आयोजन केलं आहे, इतर विषयक प्रॉब्लेम्स इत्यादी अनेक विषयांचा समावेश असतो. जेणेकरून परदेशी विद्यार्थ्यांना भारत देशातील कंपनी विषयक संपूर्ण माहिती मिळेल.
प्राचार्य पी.ए.गाडगे, उप प्राचार्य एम.झे.शेख, प्रा.बोबडे,प्रा.यलमलवार,प्रा.सोनडवले,प्रा.कारेमोरे,प्रा.जेणेकर,प्रा.ऐकरे यांचेही सहकार्य लाभले, गेस्ट लेक्चर्स हा उपक्रम यशस्वी होण्यात शिक्षकांचादेखील मोलाचा वाटा आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नौशाद सिद्धकी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here