जनता च्या विद्यार्थ्यांचे पाऊल पडते आधुनिक AI तंत्रज्ञानाकडे.

जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे आनंददायी शनिवार

दैनिक मीडिया वार्ता
अहिल्यानगर
सुनील भालेराव 9370127037

अहिल्यानगर :कोपरगाव. दि.30.8.25
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जनता इंग्लिश स्कूल मध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत.. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लॅब उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री.चंद्रकांत भागवत लोखंडे साहेब तसेच AI तंत्रज्ञान तज्ञ कु.साईश्रद्धा अरविंद सालमुठे प्रमुख अतिथी म्हणून आणि सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य सन्माननीय श्री.मधुकरराव काशिनाथ साबळे,दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,सातारा च्या कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री.अरविंद सालमुठे साहेब,विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.सर पर्यवेक्षक सन्माननीय श्री.जेजुरकर व्ही.के.सर विद्यालय AI विभाग प्रमुख श्री.बोढरे के.बी. सर तसेच संगणक विभाग प्रमुख श्री.तायडे एन.एस.सर आनंददायी शनिवार विभाग प्रमुख श्री.पाकले ओ.बी.सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(MSRTC)च्या अहिल्यानगर व नाशिक आगाराच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने QR CODE तयार करणाऱ्या व या QR CODE चे पेटंट प्राप्त करणाऱ्या AI तंत्रज्ञान तज्ञ प्रमुख अतिथी कु.साईश्रद्धा अरविंद सालमुठे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत लॅबचे उद्घाटन झाले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेला AI तंत्रज्ञानाचा प्रतिकात्मक रोबोट आणि अटल लॅब साहित्यातून निर्मीत रोबोट यांचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात आले.कु.साईश्रद्धा सालमुठे यांनी आपल्या मनोगतात AI तंत्रज्ञानाद्वारे QR CODE ची निर्मिती, त्याचा वापर,फायदे अभ्यासक्रमातील AI तंत्रज्ञानाचे महत्व अशा विषयांवर विद्यार्थ्यांशी हितगुज केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.चंद्रकांत भागवत लोखंडे साहेब व सन्माननीय श्री.मधुकरराव काशिनाथ साबळे यांनी संस्थेच्या नियोजनाप्रमाणे विद्यालयातील AI लॅब साठी शुभेच्छा देवून कु.साईश्रद्धा सालमुठे यांची प्रेरणा घेऊन आधुनिक युगातील AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अध्ययन करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.यांनी तसेच विभाग प्रमुख श्री.बोढरे के.बी. यांनी विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाची माहिती सांगून त्याच्या वापराचे महत्व अधोरेखित केले.सूत्रसंचालन श्री.खेताडे सर व आभार श्री.तायडे सर यांनी मानले.
संवत्सर: कोपरगाव तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल मध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दि.30/08/2025 रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लॅब उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.

🔹🔹🔹