अहेरी भूमी अभिलेख कार्यालयात गैरकारभार चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार

64

अहेरी भूमी अभिलेख कार्यालयात गैरकारभार

चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई करा
: संतोष ताटीकोंडावार

अहेरी भूमी अभिलेख कार्यालयात गैरकारभार चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार
अहेरी भूमी अभिलेख कार्यालयात गैरकारभार
चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई करा
: संतोष ताटीकोंडावार

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335

अहेरी : -उपअधिक्षक भूमी अभिलेख अहेरी कार्यालयात मागील काही वर्षापासून अनेक गैरकारभार सुरु आहेत. या गैरकारभाराची चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालया नागपूर प्रदेश, नागपूर यांचेकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उपअधीक्षक भूमी अभिलेख अहेरी कार्यालयातील प्रभारी उपअधीक्षक नासीर जी. पठाण यांचेकडे संबंधित कार्यालयीन समस्या वा तक्रार मांडली असतांना ते नेहमीच कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत दिसून येतात. त्यांना काही विचारणा केली असता तुम्ही वरिष्ठांकडे माझी तक्रार केली तरी माझे काहीही वाकडे करु शकत नाही, अशी अशोभनीय भाषा वापरतात. प्रशासकीय अधिकारीचे हे वर्तन निश्चितच अशोभनीय असे आहे. सदर कार्यालयाचे कर्मचारी निमतानदार प्रकाश रामदास श्रीरामे यांची 9 ऑग्स्ट 2021 रोजी प्रशासकीय बदली नगर भूमापन क्र. 1 नागपूर येथे झाली असतांनाही त्यांना आजपर्यंत कार्यामुक्त करण्यात आलेले नाही. हे सर्व प्रभारी उपआीक्षक यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचा आरोपही ताटीकोंडवार यांनी निवेदनातून केला आहे.
अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली येथील अक्षिक पत्रिकेवर क्षेत्र वाढविणे, अतिक्रमण परस्परे नोंद घेणे, नकाशा दुरुस्ती करणे अशाप्रकारचे कुठलेही आदेश न काढता आर्थिक देवाणघेणावर करुन परस्पर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश श्रीरामे सर्रासपणे काम करीत आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालयातील इटीएस मशनिचा वापर करुन खासगी मोजणीचे कामे मुकरमापक समय्या रमय्या बोमनवार व प्रकाश श्रीरामे करीत आहेत. खासगी मोजणी करुन नागरिकांना शासकीय मोजणी केल्याचे सांगून शुद्ध फसवणूक केली जात आहे. अहेरी, नागेपल्ली, गडअहेरी, वांगेपल्ली, कोत्तूर अशा अनेक ठिकाणी बिनशेती प्रकरणाची खासगी मोजणी त्यांनी केली असून दोघांनीही शासकीय इटीएस मशिनचा दुरुपयोग करीत शासकीय महसूल बुडविला असून कार्यालयाची दिशाभूल केली आहे. समय्या बोमनवार व प्रकाश श्रीरामे शासकीय कर्मचारी असताना जमीन खरेदी विक्रीची व्यवहार कार्यालयीन वेळेत करीत सामान्य जनतेची कामे करण्यास टाळाटाळ वा दिरंगाई करीत आहेत. बोमनवार यांनी पदाचा दुरुपयोग करीत अहेरी व नागेपल्ली येथे जमीन मिळविली आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचा-याच्या कामाची सखोल चौकशी करुन दोषींवर निलंबनाची कारवाई करीत कठोर शिक्षा देण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली आहे.