भंडारा: गरोदर पत्नीची पती आणि सासरच्यांनी मिळुन साडीने गळा आवळुन केली हत्या. हत्येच कारण जाणुन तुम्हालाही राग येणार.

✒त्रंबक सातकर ✒
भंडारा/ गोंदीया प्रतिनिधी
भंडारा:- भंडारा जिल्हातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. दहेज प्रथा समजाला लागलेली एक किड आहे, त्यामूळे अनेक नवविवाहीतेला मरणाच्या द्वारात लोटले आहे. या पैसासाठी अनेक मुलीचे प्राण घेतले आहे. अशीच एक सर्वत्र खळबळ उडवणारी समाजमन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी गर्भवती सुनेचा गळा आवळून हत्या केल्याची घटना लाखांदुर तालुक्यातिल चप्राड येथे घडली आहे. मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद करत नराधम पती, दीर व सासुला अटक केली आहे.
रंजना होमराज बघमारे वय 25 वर्ष असे मृतक सुनेचे नाव असून या प्रकरणी पती होमराज बघमारे वय 28 वर्ष, सासू प्रमिला बघमारे वय 55 वर्ष व दीर संजय बघमारे वय 26 वर्ष राहणार चप्राड यांना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहे.
भंडारा जिल्हातील लाखांदुर तालुक्यातिल डाभेविरली येथील रंजना हिचा विवाह माघील मार्च महिन्यात चप्राड येथील होमराज बघमारे याच्यासोबात झाला होता. सुरुवातीला दोन महिने सुखात गेले. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी रंजनाला सतत गळ घातली. रंजनाने नकार दाखवताच तिचा सतत छळ करायला सुरवात झाली.
प्राप्त माहितीनुसार, गर्भावती असलेल्या रंजनाला हत्येचा दिवशी बेदम मारहाण करून साडीने तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी भाऊ सोमेश्वर बुराडे ह्यांच्या तक्रारी वरुण पती, सासू व दीर याच्याविरुद्ध कलम 304,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. तर घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.