जळाला रे जळाला नागपूर करार जळाला” म्हणत नागपुर जिल्हात अनेक गावात नागपुर कराराची होळी.

54

जळाला रे जळाला नागपूर करार जळाला” म्हणत नागपुर जिल्हात अनेक गावात नागपुर कराराची होळी.

जळाला रे जळाला नागपूर करार जळाला" म्हणत नागपुर जिल्हात अनेक गावात नागपुर कराराची होळी.
जळाला रे जळाला नागपूर करार जळाला” म्हणत नागपुर जिल्हात अनेक गावात नागपुर कराराची होळी.

युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर,दि.30 सप्टेंबर:- विदर्भ राज्य आंदोलन समीती तसेच शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नागपुर जिल्हातील नरखेड तालुक्यातील मोवाड, खैरगाव, व नरखेड या तीन गावात नागपुर करार 1953 च्या नागपूर कराराची नुकतीच सार्वजनिक होळी करण्यात आली.

या करारानुसार विदर्भाला सापत्न वागणूक देऊन येथील बेरोजगार तरूणांना शासकीय सेवेत नौकर्‍या न दिल्यामुळे, शेतीचे सिंचन प्रकल्प न केल्यामुळे व येथील कापसावर प्रक्रिया कारखाने न काढल्यामुळे येथील जमिन, जंगल, गौनखनिजांचे नेहमीच दोहन करून लोडशेडींग
विदर्भात पण मुंबई—पुणे उजेडात ठेऊन येथील शेतकरी, मजुर व तरूणांचे आत्महत्येचे जास्त प्रमाण हे विदर्भात आहेत, यासाठी नागपुर करार करण्यात आला होता परंतु सन. 1953
च्या नागपुर कराराची अंमलबंजावणी न करता सरकारणे त्या कराराचे काय केले. ऊलट विदर्भात बेरोजगारी, लोडशेडींग, तसेच शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे अशा कराराची नरखेड तालुक्यातील मोवाड, खैरगाव व नरखेड या तिन गावात सामुहीक होळी करून “जळाला रे जळाला, नागपुर करार जळाला” अशा घोषणा देऊन विदर्भाची जनता खेद व्यक्त करीत असल्याचे यावरून दिसले. दरम्यान तरूणांनी वेगळ्या विदर्भातील आंदोलनात जास्तीत जास्त संखेने सामील होण्याचे आव्हान ऊपस्थित वक्त्यांनी केले.

याप्रसंगी मदन कामडे विदर्भ शेतकरी संघटना अध्यक्ष, सुनिल वडस्कर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमेटी सदस्य, वृषभ वानखेडे यांनी तीनही गावातुन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी झालेल्या सभेचे संचालन तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष वसंतराव वैद्य, तर आभार रामचंद्र बहुरूपी यांनी मानले. यावेळी आंदोलनाला नरखेड येथे प्रशांत कुर्‍हाडे, युवराज सातपुते, भुरू शेख, जियाहुलहक शेख, निलेश पेठे, केवल तुमडाम, मोवाड येथील विठ्ठलराव मानेकर,
ज्ञानेश्वर राऊत, शंकर ढेपले, गणेश राऊत, दिनदयाल वैद्य, राहुल बले, प्रविण सातपुते, खैरगाव येथे प्रशांत वानखेडे, अरूण बेलसरे, विठ्ठल आटोने आदी शेतकर्‍यांची तरूण मुले
होळी आंदोलनाला प्रामुख्याने ऊपस्थीत होते.