लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणार्या संकेत वाघेचे जंगी स्वागत

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट ३०/०९/२१
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतातून संकेत वाघे याने 266 वा क्रमांक प्राप्त करीत हिंगणघाट शहराचाच नव्हे तर वर्धा जिल्ह्याचाही गौरव वाढविला आहे. त्याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.
29 रोजी संकेतच्या स्वागत शहरात साई मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शहरात आगमन होताच शिवाजी पार्क येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून संकेत वाघे याची वाजत गाजत मिरवणूक निघाली. या दरम्यान त्याचे अनेक संस्था, संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले.संकेत वाघे याचे शालेय शिक्षण येथेच झाले असून पुढील शिक्षण रामकृष्ण मठ येथे राहून घेतले आहे.