नागपुर: मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून संपावर.

55

नागपुर: मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून संपावर.

नागपुर: मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून संपावर.
नागपुर: मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून संपावर.

युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर आरोग्य सेवक डॉक्टरांन कडुन एक बातमी समोर आली आहे. नागपुर येथील शासकीय मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील डॉक्टर हे 1 ऑक्टोबर पासुन संपावर जाणार आहे.

कोरोना वायरसच्या महामारीच्या काळात मागील दीड वर्षापासून सातत्याने सेवा देेणाऱ्या निवासी डॉक्टरांची शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आणि इन्सेन्टिव्ह देण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले होते. मात्र कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरूनही शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यामुळे नाराज झालेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील मेडिकल कॉलेज आणि मेयोमधील निवासी डॉक्टरांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

शासन स्तरावर सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू आहे. मात्र काहीच तोडगा न निघाल्याने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय येथील निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. डॉक्टरांनी काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होऊ शकते. मेयोमध्ये 150, तर मेडिकलमध्ये 600 निवासी डॉक्टर आहेत. यांपैकी कोविड 19 अती दक्षता आणि आईसीयूमधील सेवा नियमित ठेवण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. बुधवारी मेडिकल कॉलेज आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या आंदोलनासंदर्भात अधिष्ठातांना पत्र सादर केले.