नागपूर जिल्ह्यात आढळली चार हजार वर्षे पुराणा दगडी मण्यांच्या कारखाना.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर जिल्हातून एक एतिहासिक बातमी समोर आली आहे. नागपुर जिल्हा हा प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचा असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय स्थानी असलेले नागपुर शहराच्या झिरो माईलपासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने चार हजार वर्षे पुराणी रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या कारखाण्याचा शोध लावला आहे. मिळालेल्या कारखाण्यात आभूषणांसाठी दगड घासून रंगीत मणी तयार केले जायचे. येथील उत्खननात अनेक नव्या वस्तू मिळाल्यामुळे याला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हे नागपूर सर्कलमधील 14 वे पुरातत्त्व महत्त्व असलेले संरक्षित स्थळ ठरणार आहे.
ही रंगीत मन्याचा कारखाना जुनापानी जवळील माहुरझरीत एका नाल्याजवळ उत्खननात हे स्थळ आढळले आहे. येथे दगडांचे दागिने बनविण्यासाठी कच्चा माल, ते तयार करण्यासाठी विशेष कक्ष, उत्पादनासाठी लागणारी दगडांपासून बनविलेली उपकरणे मिळाली आहेत. ही उपकरणे त्या काळात विदर्भात राहणाऱ्या मानवाच्या कलात्मकतेचे दर्शन घडवितात. सोबतच यावरून दगडांना कलात्मकतेने कोरण्याच्या त्या काळातील मानवाच्या युक्तीचा अंदाज येतो. येथे त्या काळात पुरलेले मानवी सांगाडेही मिळाले आहेत. पाषाणकाळात दगडांवर कोरीव काम करून त्यांना बारीक छिद्र करण्याच्या तंत्राची माहितीही येथे मिळाली, हे सुद्धा उल्लेखनीय ! एएसआयने या प्रकल्पाला सॉल्व्हेजिंग आर्कियालॉजी नाव दिले आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या या पुरातन स्थळामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
‘विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मेगालिथिक व लोहयुगाच्या संस्कृतीचे स्थान आहे. माहुरझरीचाही यात समावेश आहे. या काळात शिलावर्तुळ तयार करून मृतदेह दफन केले जायचे. त्याचे सांगाडेही मिळाले आहेत. या विषयावर आम्ही अभ्यास केला होता. सध्या काही अवशेष सापडले असून, एएसआयची चमू यावर संशोधनात्मक काम करीत आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.