सांगली: पत्नीचा चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या, छळ करणा-या पतीचा पत्नीनेने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून केली हत्या.

==== मुख्य मुद्दे ====
●सांगलीतील घटनेनं सर्वत्र खळबळ, संतापलेल्या पत्नीने पतीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि त्याच चाकूने पतीच्या गळ्यावर वार केले.
●चारित्र्यावर संशय घेऊन सतत छळ आणी वाद
● पत्नीनेने केली पतीची दगडाने ठेचून हत्या.
✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली :- सांगली जिल्हाला हादवळणारी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पत्नीचा चारित्र्यावर सतत संशय घेऊन वाद घालणाऱ्या पतीने आपल्याच पत्नीने दगडाने ठेचून आणि चाकूने भोसकून हत्या केलाने सर्वीकडे एकच हाहाकार माजला. ही घटना आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे दि.29 बुधवारला दुपारच्या सुमारास घडली. श्रीकांत श्रीपती खरात वय 44 वर्ष असं मयत पतीचं नाव आहे. तर याप्रकरणी आरोपी पत्नी वैशाली श्रीकांत खरात वय 38 वर्ष हिला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयत श्रीकांत खरात आणि आरोपी वैशाली खरात हे दाम्पत्य गोमेवाडी येथे राहत होते. मयत हा पत्नीच्या चारित्र्याच्या सतत संशय घेऊन छळ करायचा या दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. काही करणावरुन बुधवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. त्यावेळी पती चाकू घेऊन पत्नीच्या अंगावर धावला. त्याने पत्नी वैशाली हिच्या पायावर चाकूने वार केले. यात पत्नी जखमी झाली. संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याच चाकूने पतीच्या गळ्यावर वार केले. यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केला.
घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विटा उपविभागीय उपअधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी वैशाली खरात हिला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दगड ताब्यात घेतले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.