गांधीजीचे विचार आज मरत चालले की काय?

        जगात खास करुन दोन लोकांचा जास्त अभ्यास केला जातो.एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दुसरे राष्ट्रपिता महात्मा गांधी.हे दोघंही गौतम बुद्धाच्या विचाराने प्रेरीत झालेले दिसतात.

       रणाविण स्वातंत्र्य जर कोणाला मिळाले तर त्यात पहिला क्रमांक भारताचा लागतो.भारतात मुळात दोन गट होते.ज्यावेळी ब्रिटीशांचं राज्य होतं.या ब्रिटीशांना हाकलण्यासाठी देशातील देशभक्ताचे जे दोन गट पडले.त्या गटाला जहाल व मवाळ गट म्हणत.जहाल गट हा क्रांतीकारी गट होता.मरेल पण सत्यच बोलेल आणि मरेल पण मारुन मरेल.मार खावून मरणार नाही.अशा विचारांचा गट.हा गट ब्रिटीशांना असहकार दाखवत होता.तर दुसरा गट मवाळ गट होता.ह्या गटाचं म्हणणं होतं की जर आपण इंग्रजांना मदत केली,विरोध केला नाही तर एक दिवस इंग्रजांना दया येईल व तो आपल्याला एक दिवस देश चालवायला देवून जाईल.

       महात्मा गांधी येण्यापूर्वी इथे आगरकर हे मवाळ गटाचे तर टिळक हे जहाल गटाचे नेते होते.टिळकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरुन जनतेत इंग्रजांविरुद्ध असंतोष भारतीय मनात निर्माण केला होता.त्यांनी देशात शिवजयंती गणेशोत्सव सुरु केला होता.त्यांनी स्वदेशी,शिक्षण स्वराज्य आणि बहिस्कार ही चतुसुत्री मांडून जनतेला चेतविले.त्यांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षाही भोगल्या.पण ते फार काळ जीवंत राहिले नाही.एक ऑगस्ट १९२० ला ते मरण पावले.त्यांच्या निधनानंतर देश साधारणतः पोरका झाला होता.आता कोण?देश वाली शोधत होता.अशावेळी या देशाचं नेतृत्व स्विकारलं ते महात्मा गांधी यांनी.

        महात्माजींनी बार्डोलीचा सत्याग्रह केला होता.तसेच ते बँरीस्टर पदवीने विभुषीत असून त्यांनी आफ्रीकेत शेतक-यांसाठी केलेले आंदोलन.चंपारण्याचा सत्याग्रह इत्यादी गोष्टी त्यांनी सहज हाताळल्या होत्या.त्यामुळं या नेतृत्वहिन व पोरक्या झालेल्या समाजाला टिळकानंतर महात्मा गांधीनी नेतृत्वाची आस दाखवली.त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने का होईना या देशातील समस्त बांधवांना एकत्र आणलं.नव्हे तर असहकार आंदोलनातून,सविनय कायदेभंगातून त्यांनी स्वातंत्र्याची जी ज्योत पेटवली.ती ज्योत वाखाणण्याजोगी आहे.आज आपण भारतीय बहुसंख्य असलो तरी इंग्रजी फौजेसमोर आपला टिकाव लागू शकत नाही हे महात्माजींनी ओळखलं.कारण इंग्रजांजवळ अत्याधुनिक शस्रास्रेे होती.तसेच त्यांच्याकडे आपलीच भारतीय माणसे नोकरी करीत होती.हे इंग्रज एवढे धुर्त होते की ते आपल्याच माणसांकडून आपल्यावरच हल्ला करुन आपल्याच माणसांना नेस्तनाबूत करीत होती.हे मात्र आपल्याच माणसांना कळत नव्हते.जर क्रांतीकारी मार्ग अवलंबला असता तर भारतीय माणसे केव्हाच संपली असती.म्हणून महात्माजींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी लढा द्यायचे ठरवले.त्यांनी लढाईची हत्यारे बनवली.ती हत्यारे म्हणजे सत्य,अहिंसा,सत्याग्रह,असहकार ही होय.गौतम बुद्धांनी सांगीतलेला अहिंसा ह्या तत्वाने तर बुद्धाने सा-या जगाला जिंकलं होतं.हे महात्माजींना माहीत होतं.

       आज देश स्वतंत्र्य झाला ती महात्मा गांधीजींचीच देण.आजही देशाला त्यांच्या विचारांची गरज आहे.मरण आलं तरी चालेल,पण मी सत्यच बोलणार हा त्यांचाच संदेश.आजही न्यायालयात याच विचाराने शपथ घेतली जाते.गीतेची शपथ टाकली जाते.मी शपथ घेतो की मी न्यायाधीशासंमोर सत्य बोलेल,खोटं बोलणार नाही.मग बयाणं विचारली जातात.तेव्हा साक्ष द्यायला आलेले लोकं चिकार खोटं बोलतात.शपथ गेली खड्ड्यात.शिवाय वकीलही सर्रास खोटं बोलून केस जिंकून जातात.सत्य पदोपदी मरतं.ही वास्तविकता आहे.आजच्या काळात न्यायालयच नाही तर जागोजागी सत्य चालत नाही.खोटं बोलल्याशिवाय भागत नाही.पोट भरता येत नाही.मग सत्य तरी कोण बोलेल!

         आज मितीला जागोजागी रावणाचेच राज्य आहे.रावण तरी बरा होता,पण आज जागोजागी रावण पसरलेले आहेत.कोणी फितूरी करतात.कोणी अत्याचार करतात,कोणी बलत्कार करतात तर कोणी दवाखान्यातच मानवी अवयवाची तस्करी.सर्वत्र खोटं बोलून…..खोटा व्यवहार करुन.

        आज देशात कायदेही असेच आहेत.न्यायालयातून आरोपी मोकाट सुटतात तर इमानदार शिक्षेच्या कक्षेत अडकतात.महात्माजींनी तर सविनय कायदेभंग करुन मिठाचा एकच कायदा मोडला.पण आज देशात कितीतरी कायदे मोडावेसे वाटतात.देश स्वतंत्र असला तरी.महात्माजींनी असहकार दिलं वाईट लोकांना मदत करु नये हाच या असहकाराचा उद्देश.पण आज या असहकाराचा अर्थ आम्ही वेगळाच घेतला.तो म्हणजे चांगल्या गोष्टीला सहकार्य करु नये वाईट गोष्टीला आम्ही सहकार्य करतो.तसेच महात्माजींनी सांगीतलेले सत्याग्रह अर्थात आंदोलन. आम्ही हेही आंदोलन आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतो.

       पर्यायाने सांगायचे झाल्यास आम्ही महात्मा गांधीच्या विचारांची हत्या करीत आज सुटलेलो आहोत.आज आमची बेटी सुरक्षीत नाही.ते इंग्रज तर देश सोडून गेले आपला.पण या देशावर हे भलतेच इंग्रज येवून बसलेत.जे राज्य तर करीत आहेत.पण त्यांना सर्वसामान्यांचा विचार नाही.त्यामुळंच महात्मा गांधीच्या विचारांची आज हत्या होत असलेली दिसत आहे नव्हे तर त्यांचे विचार मरत चाललेले दिसतात.विशेषतः सांगा.सांगायचे झाल्यास महात्मा गांधी की ज्यांनी ह्या देशाला स्वतंत्र्य करण्या महत्वपुर्ण योगदान दिलं.त्या महात्माजींनाच मारायला या देशातील समस्त बांधवांनी मागे पुढे पाहिले नाही.त्या देशातील माणसे,महात्मा गांधी कितीही महान असले तरी त्यांचे विचार मांडणार काय?ही विचार करायला लावणारी बाब आहे.खरंच महात्माजींचे विचार मरत चालले आहेत,जे विचार या देशासाठी क्षणोक्षणी महत्वाचे आहेत याचाही विचार या देशातील लोकांनी करावा.तेच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.

अंकुश शिंगाडे नागपूर

मो: ९९२३७४७४९२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here