यंदाच्या गणेश विसर्जनाला मुरुडच्या ताराराणी महिला ढोल ताशा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले

यंदाच्या गणेश विसर्जनाला मुरुडच्या ताराराणी महिला ढोल ताशा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले

यंदाच्या गणेश विसर्जनाला मुरुडच्या ताराराणी महिला ढोल ताशा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-मुरुड-जंजिरा नवाबकाळा पासून सांस्कृतिक वाटचालीत आपले वेगळेपण टिकवून आहे. कला, क्रीडा सांस्कृतिक परंपरेचा अभिमानास्पद वारसा गणेश विसर्जनाच्या माध्यमातून नव्याने वृद्धिंगत केला आहे. “ताराराणी ढोल पथक”च्या माध्यमातून मुरुडच्या “नव गृहिणींनी”मुरुड येथील प्रसिद्ध डॉ. राज कल्याणी यांच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण असतेच पण यावर्षी तिचे वेगळे पण वेगळेच ठरले.ह्या मिरवणुकीत आपल्या स्थानिक “ताराराणी महिला ढोल पथक” यांनी आपल्या सर्वांचे लक्ष वेधले.कल्याणी परिवाराच्या श्री विसर्जन सोहळ्याच्या माध्यमातून.मुंबई, पुणे येथील गणेश विसर्जन मिरवणुका आपण नेहमी पाहतो. त्यांचा मोठा जल्लोष अनुभवतो. पण यंदा तसाच तीन चार तासाहून आधीक काळ सुरू असलेला जल्लोष मुरुडकर जनतेने अनुभवला.मुरुड-जंजिरा सारख्या छोट्या शहरात डॉ.कल्याणी यांच्या गणपती विसर्जन मिरवणूक दणकेबाज ढोल पथकच्या वाद्या सोबत तब्बल चार ते पाच तास सुरू होती. विशेषतः चार तासाहून आधिक वेळ ताराराणी ढोल पथकाच्या महिला सलगपणे ढोल ताशाचे आवाज घुमवित होत्या. जोडीला ढोल ताशाच्या भोवती रिंगण करून विविध वेशात सजलेल्या नटलेल्या युवती शानदार असे भोवरी नृत्य करीत होत्या. सर्व भक्तांचा उत्साह उल्लेखनीय होता.

डॉ.कल्याणी हॉस्पिटल मधून निघालेली ही भव्य मिरवणूक पुरकर नाका, हनुमान हॉटेल, एकदरा पुल मार्गे समुद्रावर पोहोचली. प्रत्येक ठिकाणी थांबून ढोलताशाच्या तालावर गणेश भक्तगण उत्साहाने नाचत होते. रस्त्याच्या दुतर्फा हे विलोभनीय दृश्य पाहणाऱ्यांची गर्दी जमली होती. ही गणपती विसर्जन मिरवणूक आहे की एखादा कलामहोत्सव आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. संध्याकाळी सहा साडेसहाला सुरू झालेली ही मिरवणूक जवळ जवळ साडेतीन चार तासांनी समुद्रावर पोहोचली. गेले दहा दिवस कल्याणी हॉस्पिटल मध्ये स्थानापन्न झालेला हा गणपती आता सर्वांचा निरोप घेणार होता. सर्व गणेशभक्तानी साश्रू नयनांनी या बाप्पाला निरोप दिला आणि सर्व भक्तगण आपापल्या घरी परतले.बाप्पाच्या निरोपसह यंदा त्यांना ताराराणी पथकाने दिलेल्या नव्या आनंदाचे वेगळे समाधान देखील होते.असा हा शानदार सोहोळा सर्व मुरूडकरानी अनुभवला. सर्वजण मात्र सतत तीन चार तास अखंड ढोल ताशा वाजविणाऱ्या महिलांचे कौतुक करत होते. ताराराणी ढोल ताशा पथक हे
रागरागिणी महिला कलामंचच्या अंतर्गत असून हे कलामंच अनेक समाज प्रबोधनकारक उपक्रम आता राबवणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here