अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय पालक समितीच्या अध्यक्षपदी विजयानंद शिंगणकर तर उपाध्यक्षपदी कपिल अडागळे यांची सर्वानुमते निवड...

अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय पालक समितीच्या अध्यक्षपदी विजयानंद शिंगणकर तर उपाध्यक्षपदी कपिल अडागळे यांची सर्वानुमते निवड…

अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय पालक समितीच्या अध्यक्षपदी विजयानंद शिंगणकर तर उपाध्यक्षपदी कपिल अडागळे यांची सर्वानुमते निवड...

✒️बबलू भालेराव (तालुका प्रतिनिधी उमरखेड मो.9637107518

उमरखेड (दि. 30 सप्टेंबर) तालुक्यातील मरसुळ येथील समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय निवास शाळा येथे मुख्याध्यापिका रिया लिचडे यांच्या नेतृत्वात पालक सभा पार पडली.

या मीटिंगमध्ये अनुसूचित जाती जमाती पालक समितीच्या अध्यक्षपदी विजयानंद मधुकर शिंगणकर (बेलखेडकर) तर उपाध्यक्षपदी बंदी भागातील कपिल आढागळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी वस्तीगृहातील रिया लिचडे मॅडम,मुन सर, फंड सर,राऊत सर,बरडे सर, बोरीकर मॅडम, जंगले मॅडम,लिपिक आडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

उमरखेड येथे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे (बेलखेडकर) यांच्या घरी बंदी भाग विकास समिती सदस्य व वन व्यवस्थापन समितीचे सचिव यांच्यातर्फे तसेच भीम टायगर सेना सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, बबलू भालेराव (पत्रकार) यांच्या हस्ते पालक समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अनुसूचित जाती जमाती मुलींची शासकीय निवासी शाळा मरसूळ, पालक समिती चे देवानंद वाडेकर, पंकज दिपके, आनंद वाठोरे, राजू बरडे, कविता शिंगणकर, धम्मपाल कांबळे, सुनीता दामोदर, विजय राठोड, धम्मशिला काळबांडे इत्यादी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here