समुह शाळा

55
समुह शाळा

कविता

समुह शाळा

समुह शाळा

आदिम भटके विमुक्त
आताच शिकू लागले
वस्तीवरल्या शाळेत
गुरुजी सोबत रमले

विसरुण नदी नाले
सुनसान झाले ओढे
पाटी पेन्सिल घेऊन
गिरवू लागले धडे

आले एक फर्मान
बंद करा वस्तिशाळा
खर्चास कारण की
म्हणुनी समुह शाळा

वाडी वस्तीची लेकरं
जनु रानातील पाखरं
शिक्षणाला लागली
आता त्यांच्या घरघर

काट्या कुट्याचे रस्ते
नदी नाल्यास पूर
पोर जाई शाळेत
मनी भितीचं काहुर

कवी… मारूती खुडे गुरुजी

संकलन…. गोपाल नाईक
युवा पत्रकार नांदेड