शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या नावाने 33 लाखांची फसवणूक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून मोठ्या रक्कमेच्या फायद्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील एका इसमाची तब्बल 33 लाख 43 हजार 100 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत 13 डिसेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान चेंढरे येथील फिर्यादी यांच्या निवासस्थानी ही घटना घडली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईल नंबरवर इंडीयन स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट ग्रुप नाव असलेलया व्हॉटसअॅप ग्रुप आहे. तीन अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादी यांना एक लिंक पाठवली. ती लिंक फिर्यादींनी डाउनलोड करताच त्यांच्या मोबाईलमध्ये आरओएआरके हे अॅप्लीकेशन डाउनलोड होवुन त्यावर कोणताही अकाउंट नंबर नसलेले अकाउंट तयार करूनवरील व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर्स मार्केटबाबत शेअर्स खरेदी, विक्रीबाबत माहीती देवुन शेअर्सकरीता बॅक अकाउंट नंबर पाठविण्यात आला. त्यावर वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगितल्याने फिर्यादी यांनी तीन आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी त्यांच्या एच.डी.एफ.सी. बॅक खाते यावरील एकूण 33 लाख 43 हजार 100 हे ट्रान्सफर केल्यानंतर सदरचे फिर्यादी यांचे पैसे परत मिळविण्याकरीता मार्गदर्शन फी म्हणुन रक्कम 3 लाख असे भरावे लागतील असे सांगुन सदरचे पैसे न भरल्याने तीन आरोपी यांनी मेसेजला रिप्लाय देणे बंद करून आरओएआरके या अॅप्लीकेशनवर रक्कम रूपये 33 लाख 43 हजार 100 व त्यावर प्रॉफिट रक्कम रूपये 92 लाख 97 हजार 667 मिळाल्याचे दाखवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून रक्कम रूपये 33 लाख 43 हजार 100 ची फसवणुक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि किशोर साळे हे करीत आहेत.