पावसाने भात लोळवले
शेतात पाणी भरले
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हा दोन दिवसापूर्वी पावसाने जोरदार बॅटिंग केली दमा दमाने जोरदार मुसळधार सरी पडत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. दिवसभरात एकूण 842.80 मिनिटे पाऊस पडला असून सरासरी 52.80% पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकाने मान टाकली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 120.90% पाऊस पडला आहे. मात्र या पावसाने शेतकरी हा चिंतेत सापडला आहे.
रायगडात गेले चार दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसात पावसाचे ढग दाटून येत होते मात्र काही भाग वगळता मोठा पाऊस झाला नव्हता. खोपोली व पालीत ढगफुटी सारखा पाऊस झाला होता. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार सुरुवात केली होती.
*जनजीवन विस्कळीत*
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. एखादी जोरदार सर आली तरी पाणीच पाणी करून जात आहे. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचत आहे. याचा जन जीवनावर परिणाम होत आहे.
*भात पिकाला फटका बसणार*
पावसाने काढणीस आलेल्या भात पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. भात पिके तयार झाल्यापासून नवरात्रीनंतर भात कापणीला सुरुवात केली होणार होती. मात्र पावसाने शेतात पाणी साचले आहे. काही ठिकाणी पीक झोपले आहे.अजून आठवडाभर पाऊस सुरू राहिला तर भरलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
अलिबाग -51
पेण-३८
मुरुड-५१
पनवेल-४३
उरण -१६
कर्जत -५७
खालापूर -२४
माणगाव -७८
रोहा-३६
सुधागड -४२
तळा-४१
महाड-४९
पोलादपूर -७३
मसळा -९५
श्रीवर्धन-५२
माथेरान-९६