Home latest News मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुण गौरव सोहळा संपन्न
मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुण गौरव सोहळा संपन्न
विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप
कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747
बेलापूर/ शिरवणे: नवी मुंबई माजी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या नेतृत्वात आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ शिरवणे येथील आयोजित कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक देऊन अंबे मातेचे दर्शन घेतले.
मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर श्री. जयवंत सुतार, माजी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, पूर्व शिक्षण समिती सभापती श्री. अर्जुन संघवी, माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेवक श्री. जयेंद्र सुतार, समाजसेविका श्रीमती निर्मला सुतार, मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.