प्रितम म्हात्रे यांच्या उपस्थितीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित

8

प्रितम म्हात्रे यांच्या उपस्थितीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित

स्वस्थ नारी – सशक्त परिवार, हाच विकसित भारताचा आधार!

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल/गव्हाण ता २९:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
सेवा समर्पण पंधरवडा
उपक्रमांतर्गत पनवेल तालुका पश्चिम मंडळ व गव्हाण जिल्हा परिषद, भाजपा यांच्या माध्यमातून “मोफत महाआरोग्य शिबिर” राबविण्यात आले होते.

शिबिरात आरोग्य सेवे सोबतच माता-बालसुरक्षा (MCP) कार्ड व प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, पोषण मार्गदर्शन व THR वितरण
अशाप्रकारे सेवा देण्यात आल्या.
महिलांसाठी विशेष तपासणी, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, लसीकरण, पोषण व विविध आरोग्य योजना यांचा नागरिकांना लाभ मिळाला.
याप्रसंगी भाजप नेते श्री.जितेंद्र म्हात्रे,श्री.सुहास देशमुख श्री.राकेश घरत ,पनवेल तालुका गटविकास अधिकारी मा.श्री.समीर वठारकर, डॉ.अपर्णा खेडेकर (आरोग्य अधिकारी पनवेल तालुका), डॉ.अस्मिता बोंम्बटकर (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाण) ग्रामसेवक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.