भक्तांच्या नवसाला पावणारी खारपाडा येथील शिवाई देवीचे जागृत देवस्थान 

12

भक्तांच्या नवसाला पावणारी खारपाडा येथील शिवाई देवीचे जागृत देवस्थान

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा गावाकडील एका टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात मोठमोठ्या वृक्षांच्या कुशीत वसलेली खारपाड्याची स्वयंभू जागृत देवस्थान म्हणून शिवाई देवीची महती सर्वत्र पसरू लागल्याने दूर दूरचे भावीक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीचा महिमा अफाट असून भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आणि नवसाला पावणारी अशी देवीची महती आहे. गेल्या शंभर वर्षापासून देवीचा महिमा गायला जात आहे. यावर्षी देवीचे नव्याने ट्रस्टी उभे करण्यात आले असून प्रथमच देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी खारपाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामानिमित्त गेल्या शंभर वर्षांपूर्वी कैलासवासी बुधाची झांजा भगत हे काम करत होते.आपल्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना येथील जागृत शिवाय देवीची महती सांगत असत,त्यावेळी ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र भगत कुटुंबयांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या गोष्टीकडे लक्ष दिले तसेच शंभर वर्षांपूर्वी मुंबई गोवा हायवेवर काम करण्यासाठी खारपाडा येथील छोटी खिंड फोडण्याचे काम चालू होते. त्यावेळी गाड्यांची व्यवस्था नसल्याने साताऱ्याहून जाधव कुटुंब आपली गाढव घेऊन माती वाहून देण्याचे काम करत असत.यावेळी शिवाई देवीचा पहिला साक्षात्कार जाधव यांना झाला .त्यानी देवीची हकीगत भगत यांच्या कानावर घातली या जागृत व स्वयंभू देवीचा जाधव कुटुंबियांना साक्षात्कार होऊन धनप्राप्ती झाली. तेव्हापासून शंभर वर्ष नकळत देवीची पूजा करत होते. आपल्याला देवीचा साक्षात्कार झाल्यानंतर साताऱ्यावरून जाधव कुटुंब या ठिकाणी देवीला भेटण्यासाठी नेहमीच येत असत. जाधव यांनी त्यांचे चिरंजीव यांना नेहमीच सांगत होते की खारपाडा येथे जाऊन देवीची स्थापना कर मात्र त्यांच्या हातून देवीची स्थापना झाली नाही. कालांतराने त्यांची त्यांना अनुभूती आल्यानंतर जाधव यांच्या मुलाने २०१४ च्या ऑक्टोबर मध्ये देवीची दहा दिवस नवरात्र उत्सव पूजा पाठ केले. ही गोष्ट ग्रामस्थ भगत कुटुंबीयांना समजल्यावर ग्रामस्थ व परिसरातील भाविक या ठिकाणी गर्दी करू लागले. याशिवाय देवीबद्दल नागरिकांची श्रद्धा वाढू लागली.

त्यानंतर भगत कुटुंबीयांनी या ठिकाणी दगडात स्वयंभू प्रकटलेल्या शिवाय देवी व वाघाची छबी असलेल्या ठिकाणी चौथरा बांधून नियमित पूजा पाठ सुरू केले. वस्तुस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात आमराई असलेल्या या ठिकाणी दोन आंब्यांच्या झाडांमध्ये देवीचे रूप असलेले दोन देवी व गणपती, वाघासह प्रतिमा असलेली पहायला मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी व भगत कुटुंबीयांनी लोक वर्गणीतून व अंग मेहनतीतून चौथरा बांधला ,त्यानंतर रोज पूजा आरती होऊ लागली. या अनुषंगाने लोकांची ओढ व भावना धार्मिक ते कडे वळून भाविक निष्ठेने व श्रद्धेने या जागृत शिवाई देवीकडे लक्ष देऊन सेवा करू लागले. अनेकांना त्यांची प्रचिती आली त्यामुळे सुखदुःखाचे गाराने मांडून नवस बोलले जातात व ते यशस्वी झाल्याचे अनुभव भाविक सांगत असतात. त्यानंतर खारपाड्याचे माजी सरपंच धनाजी भगत व भगत कुटुंबीय ग्रामस्थ प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून भाविकांची ओढ बघून शिवाई देवीची कमिटी स्थापना करून संस्था रजिस्टर केली. ग्रामस्थांनी व भगत कुटुंबीयांनी निर्णय घेऊन यावर्षीपासून नवरात्र उत्सव साजरा करण्याचे ठरविले असून त्याची उत्तम आयोजन होत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने यावेळी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे नाच भजन व्याख्यान कीर्तन पारंपारिक नाच व अन्य कार्यक्रम नियमित होत आहेत,अशी पेण तालुक्यातील खारपाडा गावातील देवीचा महिमा अफाट असून भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आणि नवसाला पावणारी अशी देवीची महती आहे.

सौ.कांचन मच्छिंद्र म्हात्रे, रांजणखार-अलिबाग