बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, बीड जिल्ह्यातील बर्दापूरात तणावाची स्थिती.

60

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, बीड जिल्ह्यातील बर्दापूरात तणावाची स्थिती.

नवनाथ पौळ 

 

बीड:- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे मंगळवारी 27 रात्री अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने गावात बुधवारी ता.28 सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. गावातील पोलिस ठाण्यासमोरच आंदोलकांनी घटनेस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत ठिय्या दिला होता. दरम्यान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बर्दापूर येथे पोलिस ठाण्याच्या बाजुलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची मंगळवारी रात्री कोणीतरी अज्ञातांनी विटंबना केली. बुधवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळुन घटनेचा निषेध केला. पोलिस ठाण्यासमोरही जमाव जमला. त्यांनी घोषणा देत, घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत, महिलांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिला होता. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बीडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री. लांजेवार व माजलगावचे पोलिस उपअधीक्षक श्री. पाटील हे बर्दापूर येथेच ठाण मांडून होते. गावातील बाजारपेठ बंद होती, परंतू गावात तणावपूर्ण शांतता होती.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करणा-र्याना तात्काळ अटक करा.

बर्दापुरातील घटनेचा काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र निषेध

 

सदरील घटनेच्या निषेधार्थ आज दि 29 रोजी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. ना.अनिल देशमुख यांना निवेदन देऊन सामाजिक सलोखा बिघडवून या पुरोगामी महाराष्ट्रात तणावाचं वातावरण तयार करु पहाणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून गजाआड करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील कृत्य करणाऱ्याना तात्काळ अटक न केल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे, अंबाजोगाई काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष अॅड.अनंत जगतकर,मा. तालुकाध्यक्ष वसंतरावजी मोरे, अखिल भारतीय काँग्रेस चे अंबाजोगाई शहराध्यक्ष तारेखअली उस्माणी,माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे, जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.