सावनेर येथे ओबीसी जागर अभियान रथाचा समारोप.


अनिल अडकिने.                                  सावनेर तालुका प्रतिनिधी,   मो .नं-9822724136

सावनेर -30 ऑक्टोंबर 2021 सावनेर येथे ओबीसी जागर अभियान रथाचा समारोप दी.30 ऑक्टोंबर ला दु.3 वा.जनता लॉन येथे पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुधीर पारवे माजी आमदार उमरेड,संजयजी गाते महामंत्री ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश,श्री. प्रकाशजी टेकाडे नागपूर जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष, श्री.रामभाऊ दिवटे ओबीसी आघाडी नागपूर जिल्हा महामंत्री, श्री.डी.डी.सोनट्टके,श्री.रवींद्रजी चौहान,श्री.राजेश गोल्हर,श्री.अशोकराव धोटे,श्री. सोनबाजी मुसळे,श्री.विजयजी देशमुख,श्री.रामरावजी मोवाडे,मंदार मंगळे उपस्थित होते.
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.9 ऑक्टोंबर पासून सुरु झालेल्या ओबीसी जागर अभियान रथ समारोप भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे करण्यात आला.
मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की ओबीसीला आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच ओबीसीची जातीय गणना झालीच पाहिजे.याच्यात अडथळा आणणाऱ्या आघाडी सरकारला धडा शिकवावा.तसेच येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कुलभूषण नवधिंगे अध्यक्ष ओबीसी मोर्चा सावनेर तालुका,श्री.प्रमोदजी ढोले तालुका अध्यक्ष सांस्कृतिक मोर्चा सावनेर,श्री.तुषार उमाटे नगरसेवक,अमोल भुरे अध्यक्ष ओबीसी मोर्चा कळमेश्वर तालुका, श्री.राजू घूगल माजी नगरसेवक, श्री. विनोद बुधोलिया,श्री.नरेंद्रजी ठाकूर,श्री.चित्तेवान यांनी धुरा सांभाळली तसेच सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here