*ब्रह्मपुरी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन*

96

*ब्रह्मपुरी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन*

*आंदोलनाला यशस्वी स्वरूप*

 

राहुल भोयर ✒
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
9421815114

ब्रह्मपुरी:- चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील covid-19 लस गोठल्या
प्रकरणी आरोग्य सहाय्यक सौ.शिला कराडे यांचे वर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.ही निलंबनाची कार्यवाही चुकीची असून ती तातडीने मागे घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी ब्रह्मपुरी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयापुढे धरणे देऊन काम बंद आंदोलन करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.गीताताई खामनकर तसेच कुमारी काजल फुलझेले , कुमारी वृषाली वासनिक,श्रीमती कलावती गेडाम , सौ.आर .आर .शेळकी, श्री धोटे आरोग्य सहाय्यक( पुरुष ),सौ.रामटेके , सौ नंदा मेश्राम ,गावकर ,सौ उरकुडे ,सौ.वासनिक ,शेख , राऊत आणि तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी माहिती देताना आरोग्य संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ खामनकर म्हणाल्या की अधिकाऱ्यांनी चौकशी करताना आरोग्य अधिकारी यांचेवर कोणतीही कार्यवाही न करता सौ.कराडे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. ही दुर्दैवी बाब असून या विरुद्ध न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
ब्रह्मपुरी येथील धरणे आणि काम बंद आंदोलन सकाळी ११. वाजेपासून सायंकाळी ५.वाजेपर्यंत सुरू होते.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने आरोग्य सेविका उपस्थित होत्या.आणि
नेमके याच दिवशी ब्रह्मपुरी चे आमदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजयजी वडेट्टीवार ,सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह ब्रम्हपुरी या ठिकाणी आले असता आरोग्य सेविकांनी त्यांनासुद्धा निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याबाबत निवेदन दिले.
मात्र एकीचे बल मना याच दिवशी शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
यांनी सदरहू निलंबनाची कार्यवाही रद्द करण्यात येऊन गीता कराडे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव या ठिकाणी त्यांना नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे काम बंद आंदोलन बंद करण्यात आले.
त्यांच्या या आंदोलनाला फलित स्वरूप आल्याने सर्व आरोग्य सेवकांनी ,कर्मचाऱ्यांनी सुखाचे स्वास घेतले व संघटनाचे बळ काय असते हे त्यांनी दाखवून दिले व समाजामध्ये संघटनेने काम करावे याचे उत्तम उदाहरण शुक्रवारच्या या आंदोलनाने सर्वांच्या समोर आदर्श म्हणून उपस्थित केला.