दलित पत्रकारावर जातिवाचक टिप्पणी; गुन्हा दाखल
विशाल गांगुर्डे,
बदलापूर प्रतिनिधी
मोब. नंबर :-9768545422
दिल्ली : युट्यूब चॅनल ‘मूकनायक’च्या संस्थापक आणि बीबीसी हिंदीच्या माजी पत्रकार मीना कोटवाल यांच्याविरोधात ट्विटरवर जातिवाचक टिप्पणी करण्यात आली आहे. त्यांच्यासहित कोटवाल यांच्या आईच्या विरोधात देखील जातिवाचक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कोटवाल यांनी २८ आॅक्टोबर रोजी दिल्लीत पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी २९ आॅक्टोबर रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे.
‘क्विंट हिंदी’च्या वृत्तानुसार, पत्रकार मीना कोटवाल यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर वंदना कटारिया आणि मोहम्मद शमी यांच्यासंबंधित ट्विट केलं होतं. त्यानंतर २६ आॅक्टोबर रोजी एका ट्विटर वापरकर्त्याने कोटवाल यांच्यावर जातिवाचक टिप्पणी केली. तसेच मीना आणि त्यांच्या आईच्या विरोधात अपशब्दांचा वापर केला. मीना कोटवाल यांना वैयक्तिक कारणांमुळे अज्ञात आरोपीच्या एफआयर नोंदवण्यास उशिर झाला, यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली. परंतु २९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*ट्विट व्हायरल झाल्यावर आरोपीने मागितली माफी*
पत्रकार कोटवाल यांच्या विरोधातील जातिवाचक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पत्रकार मीना कोटवाल यांना ट्विटवर जातिवाचक शब्दांचा वापर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्यांची ट्विटरवर जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आरोपीने ओळख जाहीर केली नाही.