॥ रोजगार निर्मिती अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम॥

✒अरुण भोले ✒
नागभिड तालुका प्रतिनिधि 9403321731
नागभीड : – नागभीड तालुक्या तील तळोधी येथील साई मंदिर येथे कृषी उत्पन बाजार समिती नागभीडचे उपसभापती रमेश बोरकर यांच्या हस्ते रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले, अध्यक्षस्थानी राज्य समन्वयक महेन्द्रकुमार मेञाम होते, तर पं,स,ब्रम्हपुरी चे सभापती रामलाल दोनाडकर यांची उपस्थिति होती, यावेळी गोल्डन अर्थ सोशल वेलफेयर सोसायटी, जिल्हा चंद्रपुर च्या वतिने अगरबत्ती, मशरुम, पापड,मेणबत्ती,पेपर कटिंग व्यवसाय तुलशी, भुईमूग,शेती, मच्छीपालन, व्यवसाय आदीचे प्रशिक्षण देण्यात आले, तर सुपरवायझर असिस्टंट परिश शेंडे, चिमूर तालुका सुपरवायझर मनोज तिजारे तसेच नागभीड,ब्रम्हपुरी, चिमूर,सिदेंवाई तालूक्यातील सुपरवायझर, असिस्टंट ,फिल्ड ऑफिसर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन राहुल रामटेके तर प्रास्ताविक वर्षा लांजेवार यांनी केले,