*गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत चेकपारगाव गावातील प्रकार*
*धान्यसाठा जप्त आणि शाळेची इमारत अजुनही सिल*

*धान्यसाठा जप्त आणि शाळेची इमारत अजुनही सिल*
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी-पंचायत समिती अंतर्गत चेकपारगाव गावात जिल्हा परिषदेची जुनी शाळा आहे या शाळेत मागिल बऱ्याच वर्षांपासून वर्ग भरत नसुन हि शाळा आत्ता मेटाकुटीला आली आहे अशावेळी सदर शाळेच्या इमारतीवर गावातील एका धान्यं व्यवसाय काने कब्जा मिळवला या इमारतीच्या खोलीत त्याचा मोठ्या प्रमाणात धान्यं साठा देखील ठेवला आहे या बेकायदेशीर प्रकारा विरोधात पारगाव ग्राम पंचायत ने सदर व्यापारा विरुद्ध कारवाही चा बडगा उगारला आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आले आणि मागिल काही वर्षांपासून चालू असलेल्या त्याचा हा प्रकार व याने रचलेला मणसूबा येथील ग्राम पंचायत च्या जागृकतेमुळे सपसेल अपयशी ठरला चेकपारगाव गावातील जुन्या शाळेच्या इमारतीच्या खोलीत गावातीलस विठ्ठल लक्ष्मण विरुडकर यांनी अतीक्रमण केले आहे त्यांनाही रुम खाली करण्याकरिता ग्राम पंचायत ने तिनदा नोटीस देऊन सुद्धा सदर व्यक्तीने आपला शेत माल त्या शासकीय इमारतीतून बाहेर काढले नाही सदर विषय ग्रामसभेत चर्चेला जाऊन विरुडकर यांना याहीवेळेस शाळेची खोली रिकामी करण्याबाबत सुचविण्यात आले यांनंतरही सदर व्यक्ती रुम खाली करण्याकरिता तयार झाला नाही सन 2012 पासून कुठलाही मोबदला ग्राम पंचायतीला न देता त्यांने शासकीय इमारतीवर कब्जा केला असून हि इमारत खाली करण्याबाबत त्यांनी अजुनही कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे ग्राम पंचायत ने सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करीत 10 आक्टोंबर 2021 पासून शेतमाल साठवणूक असलेल्या येथील जुन्या शाळेच्या इमारतीला आपला कुलूप लावून ति इमारत सिल केली आहे सदर प्रकरणावर वरिष्ठ पातळीवर काय कारवाई होणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष आहे