एका फाइलमागे 5 हजाराची लाच, अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं एकच खळबळ.

55

एका फाइलमागे 5 हजाराची लाच, अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं एकच खळबळ.

एका फाइलमागे 5 हजाराची लाच, अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं एकच खळबळ.
एका फाइलमागे 5 हजाराची लाच, अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं एकच खळबळ.

मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
📱7507130263
अमरावती:- जिल्ह्यातील तिवसा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तिवसा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात कार्यारत असणा-या एका अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं संपुर्ण अमरावती जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीमधील रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी पद्धतीवर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद निंबोरकर यांच्या अपघाती मृत्यूनं खळबळ उडाली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्यानं ते तणावाखाली होते. आपल्या मनातील भावना त्यांनी बोलूनही दाखवल्या होत्या. त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबोरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी निंबोरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. राम लंके यांनीही कुठलीही शहानिशा न करता व निंबोरकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव सादर केला. त्यामुळं त्यांची नोकरी गेली. त्यानंतर अचानक वरुडच्या बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्शी-वरूड रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईल मागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत आहेत, असं निंबोरकर यांनी म्हटल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निंबोरकर यांचा मृत्यू हा अपघात आहे की आत्महत्या, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.