प्रवाशांमध्ये तिसर्‍या दिवशीही बसेस चालू-बंद.

46

प्रवाशांमध्ये तिसर्‍या दिवशीही बसेस चालू-बंद.

प्रवाशांमध्ये तिसर्‍या दिवशीही बसेस चालू-बंद.
प्रवाशांमध्ये तिसर्‍या दिवशीही बसेस चालू-बंद.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा ३०/१०/२१
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप सलग तिसर्‍या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, काही बसेस सुरू तर काही बंद असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले. मात्र, महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण न झाल्याने कर्मचार्‍यांनी आंदोलन कायम ठेवले.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व संघटना समितीने 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे बससेवा कोलमडली आहे. वर्धा आगारातील एकही बस बाहेर निघाली नाही. तळेगाव, हिंगणघाट तसेच अन्य आगाराच्या अपवादाने बसफेर्‍या सुरू होत्या. महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर हाल होत आहेत. प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे. खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी संधीचा फायदा घेत तिकीट दरातही वाढ केली.