हिंगणघाट तालुक्यातील कुटकी येथील 6 वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यु.

46

प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348
हिंगणघाट दि.30 ऑक्टो:-
तालुक्यातील कुटकी येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुटकी येथील 6 वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार रोजी घडली असून गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त महितीनुसार तालुक्यातील कुटकी येथे घडली असून या दुर्दैवी घटनेत शहारे परिवारातील ६ वर्षीय सोहम बालकाचा बळी गेला.सोहम हा परिवारातील एकुलता एक मुलगा असून त्याला दोन बहिणी आहेत.
आज दि.३० रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास सोहम वरच्या मजल्यावरील टिनाच्या छपरावरती गेला, शॉर्टसर्किटमुळे टिनाच्या छपरामधे विद्युत प्रवाहित झाल्याने लहानग्या सोहनला विजेचा धक्का लागला व तेथेच पडून राहिला, सदर घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्याला हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,परंतु कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसातील पोलीस कर्मचारी सूर्यवंशी व सचिन सुरकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.

सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मोलमजूरी करुन जीवन जगणाऱ्या शहारे परिवारास शासनाकडून मदत देण्यात यावी अशी मागणी गावतील नागरिकांनी केली आहे.