नराधम बापाने केला 9 वर्षीय लेकीवर अत्याचार, तर 8 महिन्यांचा मुलीला पाजली दारू.

✒मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई :- मुंबईच्या उपनगर डोंबिवलीतून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. एका नराधम पित्याने आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने सर्व डोंबिवली शहर हादळल आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वडिल आणि मुलीचा पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. एका नराधम पित्याने आपल्याच पोटच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तो नराधम पित्या इतक्यावरच नथांबता, त्याने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला जबरदस्ती दारू पाजली.
डोंबिवली पश्चिममध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित 9 वर्षीय मुलगी आपल्या आई – वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत आरोपी नराधम बापानेच पोटच्या मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीना याबाबत कोणाला काही सांगू नये म्हणून शिवीगाळ व मारहाण देखील केली. मात्र, घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. याचा विरोध करणाऱ्या आईलाही तो मारहाण करायचा.
त्यानंतरही बापाने आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला मारहाण करणे असे प्रकार सुरुच ठेवले, अखेर त्याचा रोजच्या त्रासाला वैतागून पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.