जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

50

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान आशासेविका, स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहे. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सोमवारी (दि.३०) आढावा बैठकीत दिल्या आहेत. मोहिमेअंतर्गत ३५४ पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली १ हजार ९५८ पथके स्थापन करण्यात आली आहेत.

रायगड सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने सोमवारी कृष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान २०२३ जिल्हा समन्वय समितीची बैठक डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शोध अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न बाळगता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले.कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २४ लाख ५६ हजार ८७१ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, गृहभेटी दरम्यान ५ लाख ६९ हजार ४९२ घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. १ हजार ९५८ पथके तयार करण्यात आली आहेत. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे.

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव उपस्थित होते. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करणे.नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही बंचित असणा-या क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांना क्षयरोग औषधोपचाराखाली आणणे.संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुणे व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार करणे.