लॉयड्स मेंटल कंपनीच्या वसाहतीचे अवैद्य बांधकाम तात्काळ थाबवा
• दिनेश चोखारे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 30 ऑक्टोंबर
म्हातरदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरात लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे वसाहतीचे अवैद्य बांधकाम थांबवण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची आम्हाला माहिती झाली आहे. हे बांधकाम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. या बांधकामामुळे येथील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कामाची परवानगी सुद्धा ग्रामपंचायत कडून घेण्यात आली नाही असे दिनेश चोखारे यांच्या निवेदनातून म्हटले आहे. या संदर्भात योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई होईपर्यंत हे बांधकाम थांबवण्यात यावे अशी विनंती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादा पाटील चोखारे यांनी निवेदनाच्या माध्यमातुन केली. यावेळी सचिन राजूरकर, म्हातारदेवीचे सरपंच संध्या पाटील, माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य संजय टिपले यांची उपस्थिती होती.