बजाज चंद्रपुर तंत्रनिकेतन ची उल्लेखनीय कामगिरी : एनबीएने दिली तीन वर्षांची मान्यता

बजाज चंद्रपुर तंत्रनिकेतन ची उल्लेखनीय कामगिरी : एनबीएने दिली तीन वर्षांची मान्यता

बजाज चंद्रपुर तंत्रनिकेतन ची उल्लेखनीय कामगिरी : एनबीएने दिली तीन वर्षांची मान्यता

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 30 ऑक्टोंबर
सर्वोदय महिला मंडल द्वारा संचालित, बजाज चंद्रपुर तंत्रनिकेतन च्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा. राष्ट्रीय मान्यता मंडळाने बजाज चंद्रपुर पॉलिटेक्निक कॉलेजमधील तीन अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रमांना तीन वर्षांची मान्यता दिली आहे. संगणक, सिविल, आणि मेकॅनिकल इंजि. डिप्लोमा वर्ष 2024 ते 2027 या कालावधीसाठी 30 जून 2027 पर्यंत वैधतेसह मान्यताप्राप्त झाली आहे.

ही मान्यता संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी एक गेम चेंजर आहे कारण यामुळे त्यांच्या नोकरीच्या चांगल्या संधी आणि नामांकित राष्ट्रीय आणि परदेशी संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते, तसेच संस्थेच्या उज्जवल भविष्यासाठी व प्रगति साठी या मान्यतेमुळे पाठबळ मिळाले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये अर्ज सादर करून मान्यताप्राप्तीचा प्रवास सुरू झाला. मान्यता देण्यापूर्वी 27 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत एनबीएच्या तज्ञ टीमने सखोल तपासणी केली. एनबीए ही एक स्वतंत्र संस्था आहे जी विविध अभियांत्रिकी पदवी/पदविका अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक क्रियाकलपांच्या मूल्यांकनासाठी जबाबदार आहे. हे नऊ वेगवेगळ्या निकषांमध्ये शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करते ज्यामध्ये अध्यापन आणि शिकण्याच्या प्रक्रियेची गुणवत्ता, प्राध्यापक सदस्यांची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांची नियुक्ती, संशोधन आणि सल्लागार, पायाभूत सुविधा, प्रशासन, परिणाम-आधारित शिक्षण यांचा समावेश आहे. एकंदरीत तीन दिवसीय तपासणी मध्ये त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या तपासणी मध्ये समिति कडून बजाज चंद्रपुर तंत्रनिकेतन खरी उतरली असून कम्प्युटर, सिविल व मेकॅनिकल या तीन डिप्लोमा कौर्स साठी उच्च मांनाकन दर्जा देण्यात आला आहे.
संस्थेला उच्च मांनाकन दर्जा प्राप्त झाला. संस्थेच्या अध्यक्षा निलमनी बजाज, सचिव ममता बजाज, मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, प्राचार्य विजय कोयाळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here