अमरावती चालत्या ट्रॅव्हल्समध्ये स्फोट; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घटना.

55

अमरावती चालत्या ट्रॅव्हल्समध्ये स्फोट; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घटना.

अमरावती:- तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री सुमारे दोन वाजता रायपूरवरून सूरतला जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅव्हल्समध्ये अचानक स्फोट झाला. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून आग विझविण्यात तिवसा नगरपंचायत अग्निशामक वाहनाला यश आले.

प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने सीजी -19 एफ – 0231 क्रमांकाची ट्रॅव्हल्स सूरतला जाण्यासाठी निघाली. तिवसा पोलिस ठाण्यासमोरून जात असताना अचानक ट्रव्हेल्समध्ये स्फोट झाला. ही बाब समजताच ट्रॅव्हल्समधील दोन वाहन चालक व दोन हेल्पर यांनी सर्व प्रवाशांना जागे करून बाहेर काढले.

यानंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना काहीही करता आले नाही. क्षणातच घटनास्थळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आग विझविण्यात तिवसा नगरपंचायत अग्निशामक वाहनाला यश आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी धाव घेतली. मदतीसाठी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच या आगीवर नियंत्रन मिळवता आले